एक्स्प्लोर
Amazon, Flipkart, Paytm Mall Sale: आयफोनसाठी खास ऑफर
अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएमच्या सेलमध्ये आयफोनसाठी अनेक ऑफर आहेत.
मुंबई : अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएमवर सध्या वेगवेगळे सेल सुरु आहेत. या सेलमध्ये अनेक प्रोडक्टवर बरीच सूट देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोनच्या अनेक ऑफर आहेत. यात आयफोनसाठी बऱ्याच ऑफर आहेत.
iPhone 7 32GB : हा मॉडेल अॅमेझॉनवर 42,999 रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय एसबीआय कार्ड पेमेंटवर 1500 रुपये आणखी डिस्काउंट मिळणार आहे.
फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 7 41,499 रुपयांना उपलब्ध आहे. तसेच इथंही HDFC कार्ड धारकांना 1500 रुपये अतिरिक्त सूट आहे.
पेटीएम मॉलवर आयफोन खरेदी केल्यास 9000 रुपये कॅशबक मिळणार आहे. त्यामुळे हा फोन पेटीएमवर 40,096 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
iPhone 7 प्लस 128GB : फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 63,999 रुपयांना उपलब्ध आहे. एचडीएफसी कार्डचा वापर केल्यास हा फोन 62,249 रुपयात खरेदी करता येणार आहे.
हा स्मार्टफोन पेटीएमवर 68,974 रुपयांना उपलब्ध आहे. पण यावर तुम्हाला 9999 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन अवघ्या 59,174 रुपयात खरेदी करता येईल.
iPhone 6s 32GB : अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 34,999 रुपयांना उपलब्ध असून यावर एसबीआय कार्डधारकांना 1500 आणखी सूट आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 33,449मध्ये खरेदी करता येणार आहे.
फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 35,999 उपलब्ध असून एचडीएफसी कार्डधारकांना हा स्मार्टफोन 34,249 रुपयात खरेदी करता येईल.
पेटीएमवर या स्मार्टफोनची किंमत 39694 रुपये आहे. पण यावर 7200 रुपये कॅशबॅक मिळणार असल्यानं हा स्मार्टफोन 32,678 रुपयात खरेदी करता येईल.
iPhone 6 32GB : अॅमेझॉनवर हा फोन तुम्हाला 23,999 रुपयात खरेदी करता येईल. तर एसबीआय कार्डधारकांना 22,499 रुपयात हा फोन उपलब्ध असेल.
फ्लिपकार्टवर देखील हा स्मार्टफोन 23,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement