मुंबई : देशात सुरु असलेल्या इंधन दरवाढीच्या सत्रामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. देशातील अनेक मोठ्या शहरांत पेट्रोलनं शंभरीपार केली आहे. त्यामुळे प्रवास महाग झाला आहे. अशातच गाडी विकत घेण्याचा विचार करणाऱ्यांनाही काय करावं हा प्रश्न पडला आहे. अशातच एक उपाय म्हणून CNG कार्सचा विचार करु शकता. बाजारात CNG गाड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला यापैकीच काही कारबाबत सांगणार आहोत.
Maruti Suzuki Alto
मारुती सुझुकी अल्टो सर्वात स्वस्त सीएनजी ऑप्शन आहे. सीएनजी गाड्यांमध्ये अल्टो सर्वात जास्त मायलेज देते. यामध्ये तुम्हाला जवळपास 32 किमीपेक्षा जास्त मायलेजच्या या गाडीची किंमत 2.88 लाख रुपयांपासून सरु होते.
Maruti Suzuki WagonR
मारुती सुझुकी वॅगनॉर हादेखील सीएनजी गाड्यांमध्ये चांगला पर्याय आहे. या गाडीतही फॅक्टरी फिटेड सीएनजी किट मिळत आहे. यामध्ये तुम्हाला जवळपास 32 किमी पर्यंत मायलेज मिळतं. याची किंमत 5.25 लाख रुपयांच्या आसपास आहे.
Maruti Suzuki Celerio
अल्टो आणि वॅगनॉर व्यतिरिक्त सिलेरियोही CNG गाडीचा उत्तम पर्याय आहे. या गाडीचं मायलेजही उत्तम आहे. यामध्ये तुम्हाला 32 किमीपर्यंत मायलेज मिळू शकतो. सिलेरियोची किंमत जवळपास 5.37 लाख रुपयांपासून सुरु होते.
Hyundai Santro
CNG सेगमेंटमध्ये मारुती व्यतिरिक्त हुंडाईमध्येही काही गाड्या उत्तम ऑप्शन आहेत. यामध्ये सर्वात पॉप्युलर गाडी म्हणजे, हुंडाई सॅन्ट्रो. ही हॅचबॅक 30.48 किमीचं मायलेज देते. हुंडाई सॅन्ट्रोची किंमत 4.58 लाख रुपयांपासून सुरु होऊन 6.26 लाखपर्यंत आहे.
Hyundai Grand i10 Nios
हुंडाई सॅन्ट्रो व्यतिरिक्त सीएनसी सेगमेंटमध्ये कंपनीची ग्रँड आय 10 नियोसही तुम्ही घरी घेऊन येऊ शकतात. ही गाडी 20.7 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देऊ शकते. हुंडाईच्या या गाडीची किंमत 6.63 लाख रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :