Tech News : कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे लोकांचे लॅपटॉपवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. घरबसल्या लॅपटॉपवर सगळी कामं होत आहेत. यामुळे अनेकांना त्यांच्या लॅपटॉपवर 8 ते 10 तास किंवा त्याहून अधिक काळ काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉप ओव्हरहिटिंगची समस्या असणे सामान्य गोष्ट आहे.


बरेच लोक लॅपटॉप ओव्हरहाटिंगच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात, जे चुकीचे आहे. या समस्येमुळे, लॅपटॉप खूप लवकर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा लॅपटॉप चांगला ठेवायचा असेल तर तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.


कूलिंग फॅन



  • जुन्या लॅपटॉपमध्ये ओव्हरहाटिंगची समस्या अधिक असते, त्यामुळे जुने लॅपटॉप वापरणे टाळा.

  • जर लॅपटॉप जुना असेल तर त्याचे फॅन नीट करा. लॅपटॉपचा कूलिंग फॅन त्याला ओव्हर हिटिंगपासून वाचवते.

  • लॅपटॉपमध्ये घाण येऊ नये म्हणून तो वेळोवेळी साफ करावा.

  • धूळ, कचरा यामुळे लॅपटॉप खराब होतो किंवा कूलिंग कमी होते. जर अशी स्थिती असेल तर लॅपटॉपचा कूलिंग फॅन फिक्स करा.


उशी, ब्लँकेटवर लॅपटॉप चालवू नका



  • उशी, ब्लँकेट किंवा अंतरुनावर लॅपटॉप चालवू नका.

  • लॅपटॉप नेहमी सपाट पृष्ठभागावर ठेवावा.

  • लॅपटॉप कूलिंगसाठी खालच्या बाजूने हवा घेतो. जर आपण उशी किंवा ब्लँकेटवर लॅपटॉप चालवत असाल तर लॅपटॉपला चांगलं एअर वेंटिलेशन मिळणार नाही.


नियमितपणे लॅपटॉप स्वच्छ करा



  • एअरफ्लोच्या मार्गावर धूळ जमा होण्यामुळे लॅपटॉप जास्त तापतो.

  • अशा परिस्थितीत प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी लॅपटॉप सतत स्वच्छ केला पाहिजे.


काम झाल्यानंतर लॅपटॉप बंद करा



  • वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉप तासंतास सुरु राहतो.

  • म्हणून तुम्ही काम बंद केल्यानंतर लॅपटॉपला थोडी विश्रांती दिली पाहिजे.

  • झोपेच्या आधी लॅपटॉप बंद करणे आवश्यक आहे.