मुंबई : BMW Motorrad ने भारतात आपली नवी बाईक R 1250 GS BS 6 अॅडवेंचर लॉन्च केली आहे. कंपनीने दोन ट्रिम्समध्ये बाजारात लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये R 1250 GS आणि R 1250 GS Adventure यांचा समावेश आहे. कंपनीने या बाईक्सची प्री-बुकिंग आधीच सुरु केली होती. BMW Motorrad च्या R 1250 GS आणि R 1250 GS अॅडवेंचरला फक्त Pro व्हेरियंटमध्ये अवेलेबल करण्यात आलं आहे. R 1250 GS Pro ची किंमत 20.45 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर R 1250 GS Adventure Pro ची किंमत 22.4 लाख रुपये एक्स-शोरूम निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊया BMW च्या या बाईक्सचे फिचर्स...
तीन मोड...
BMW च्या या लेटेस्ट बाईक्समध्ये एक फुल-एलईडी लायटिंग सेटअप, एक यूएसबी चार्जिंग सॉकेट आणि एक ब्ल्यूटूथ-इनेबल्ड टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम, ABS प्रो व्यतिरिक्त तीन राइड मोडही देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इको, रोड आणि रेन यांचा समावेश आहे. कंपनीने यामध्ये हिल-स्टार्ट कंट्रोलसारखे स्टँडर्ड रायडिंग एड्स फिचर्सही दिले आहेत.
मिळतील हे खास फिचर्स
BMW च्या बाईकच्या ऑप्शनल किटमध्ये इलेक्ट्रॉनिक अॅडजस्टेबल सस्पेंशन, ऑटोमेटेड हिल-स्टार्ट कंट्रोल, हीटेड सीट्स, डायनेमिक ब्रेक असिस्टेंट, राईड प्रो मोड्स (डायनॅमिक, डायनॅमिक प्रो, एंडुरो आणि एंडुरो प्रो) आणि इंजिन ब्रेक कंट्रोल यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. स्टँडर्ड R 1250 GS मध्ये अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. तसेच हाय-स्पेक अॅडव्हेंचर्स ट्रिममध्ये ट्यूबलेस-टायर कम्पॅटिबल स्पोक व्हिल्स देण्यात आले आहेत.
दमदार इंजिन
BMWच्या R 1250 GS आणि R 1250 GS Adventure मध्ये 1,254 cc, ट्विन-सिलेंडर बॉक्सर इंजिन देण्यात आलं आहे. जे 134 बीएचपीच्या मॅक्सिमम पॉवर आणि 143 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्याचं काम करतो. इंजिनमध्ये बीएमडब्ल्यूची शिफ्ट कम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच हे 6-स्पीड ट्रांसमिशनसह येणार आहे.
यांच्याशी होणार स्पर्धा
BMW R 1250 GS ची स्पर्धा भारतात डुकाटी स्ट्रीटफायटर V4 आणि ट्रायम्फ स्पीड ट्रिपल 1200 आरएस यांसारख्या मोटरसायकल्सशी होणार आहे. या बाईक्स आपल्या परफॉर्मंसमुळे रायडर्समध्ये नेहमीच चर्चेत असतात. अशातच, 2021 BMW R 1250 GS रायडर्सच्या पंसतीस उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :