एक्स्प्लोर

ऑडी कंपनीच्या सीईओंना अटक, ऑटोमोबाईल विश्वात खळबळ

रुपर्ट स्टॅडलर यांच्या अटकेनंतर ऑडीचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरले.

नवी दिल्ली : गाड्यांच्या डिझेल इंजिनबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपानंतर फॉक्सव्हॅगन ग्रुपच्या ऑडी डिव्हिजनचे सीईओ रुपर्ट स्टँडलर यांना अटक करणयात आली आहे. ऑडीच्या प्रवक्त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “स्टॅडलर यांना आज सकाळी अटक करण्यात आली असून, त्यांना ताब्यात ठेवायचे की नाही, यावर सुनावणी सुरु आहे.”, अशी माहिती ऑडीच्या प्रवक्त्यांनी दिली. रुपर्ट स्टॅडलर आणि कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्यावर इमिशन टेस्टिंगमध्ये फसवणूक आणि खोट्या जाहिराती केल्याचा आरोप आहे. सराकरी वकिलांच्या म्हणण्यानुसार, स्टॅडलर किंवा इतर आरोपी पुरावे नष्ट करु शकतात म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. रुपर्ट स्टॅडलर यांच्या अटकेनंतर ऑडीचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरले.  रुपर्ट स्टॅडलर यांच्यावर नेमके कोणते आरोप आहेत? रुपर्ट स्टॅडलर आणि सहआरोपींनी फसवणुकीसाठी बनावट कागदपत्र तयार केली, ज्यामुळे इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड असूनही गाड्या विक्री करण्यास परवानगी मिळाली. फॉक्सव्हॅगन, पोर्श आणि ऑडी यांसारख्या गाड्यांमध्ये इमिशन टेस्टिंग करणारं सॉफ्टवेअर आहे, मात्र या सॉफ्टवेअरमधून योग्य माहिती मिळत नाही. बीबीसीच्या वृत्तानुसार, ऑडी A6 आणि A7 मॉडेलच्या 60 हजार गाड्यांमध्ये प्रदूषण स्तर लपवण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला गेल्याचं रुपर्ट स्टॅडलर यांनी मान्य केले. ऑडी कंपनीने नेमकं असं का केलं? अमेरिका आणि इतर काही देशांनी 2009 साली गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरुन नियम अधिक कठोर केले होते. या नियमांना डावलल्यास कंपनीला दंड आकारला जातो. या दंडापासून वाचण्यासाठी ऑडी कंपनीने गाडीमध्ये अशा सॉफ्टवेअरचा वापर केला, ज्यामुळे प्रदूषणाच्या टेस्टिंगदरम्यान चुकीचे आकडे समोर येतात. सप्टेंबर 2015 चं हे प्रकरण असून, या प्रकरणात 20 हून अधिक जण चौकशीच्या घेऱ्यात आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या

Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget