एक्स्प्लोर
असुसचा हा फोन आणखी दोन हजार रुपयांनी स्वस्त!
या फोनची किंमत 14 हजार 999 रुपये होती. म्हणजेच कंपनीने 2 हजार रुपयांनी किंमत कमी केली आहे.
मुंबई : असुसने लोकप्रिय स्मार्टफोन Zenfone 3 Max 5.5 (ZC553KL) च्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन सध्या 12 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 14 हजार 999 रुपये होती. म्हणजेच कंपनीने 2 हजार रुपयांनी किंमत कमी केली आहे.
हा फोन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 17 हजार 999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीलाच या फोनच्या किंमतीत कपात केली. आता पुन्हा एकदा या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
असुस झेनफोन 3 मॅक्सचे फीचर्स :
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 3GB रॅम
- 32GB इंटर्नल स्टोरेज
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा कोअर प्रोसेसर
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- फिंगरप्रिंट स्कॅनर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement