एक्स्प्लोर

विक्री घटली, स्वाभिमानी संजय कौल यांनी अॅपल इंडियाचं पद सोडलं!

अपेक्षित व्यवसाय न झाल्याने संजय कौल यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली: भारतीय टेलिकॉम जगतात मोठी घडामोड घडली आहे. अॅपल इंडियाचे सेल्स हेड अर्थात विक्री प्रमुख संजय कौल यांनी राजीनामा दिला आहे. संजय कौल यांनी तात्काळ पद सोडलं. अपेक्षित व्यवसाय न झाल्याने संजय कौल यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येत आहे. नुकतंच अॅपल इंडियाने 2016-17 मध्ये कंपनीची वाढ गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत बरीच घटल्याचं म्हटलं होतं. कंपनीच्या या वक्तव्यानंतर लगेचच कौल यांनी राजीनामा दिला आहे. मायकल कुलॉम यांची नियुक्ती दरम्यान, अॅपलने मायकल कुलॉम यांना संजय कौल यांच्या जागी नियुक्त केलं आहे. फ्रेंच नागरिक असलेले मायकल कुलॉम हे सध्या अॅपलचे दक्षिण आशिया विभागाचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. मायकल कुलॉम हे या कंपनीत गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी दक्षिण आशियामध्ये अॅपलची मोठी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत, कंपनीचा भारतातील व्यवसाय वाढवण्याचा मानस अॅपलचा असेल. आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये अॅपल इंडियाची विक्री 1.8 अब्ज डॉलर म्हणजेच 11 हजार 600 कोटी रुपयांवर पोहोचली. खरंतर ही 17 टक्के वाढ आहे. मात्र कंपनीला सरासरी 40 टक्के वाढ अपेक्षित होती, मात्र ती साध्य होऊ शकलं नाही. अॅपलला भारतात iPhone 8 आणि iPhone 8 Plus यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र तो मिळाला नाही. तसंच नोटाबंदीमुळेही विक्रीवर परिणाम झाला. त्यातच सरकारने आयात शुल्क वाढवलं. अशा विविध कारणांमुळे कंपनीला अपेक्षित व्यवसायाचा टप्पा गाठता आला  नाही, त्यामुळे कंपनीने भारतातील व्यवसाय घटल्याचं म्हटलं होतं. भारतातच आयफोन बनवावे लागणार दरम्यान, सरकारने परदेशातून आयात होणाऱ्या मोबाईल्स किंवा गॅझेट्सवरील सीमा शुल्क 10 ते 15 टक्क्यांनी वाढवलं आहे. तज्ज्ञांच्या मते, सरकारच्या या निर्णयामुळे अॅपलला भारतातच स्मार्टफोन बनवावे लागतील. अॅपलला भारतात सॅमसंग, शाओमी यासह अन्य कंपन्यांशी स्पर्धा करायची असेल, तर त्यांना भारतातच मोबाईल बनवण्याशिवाय पर्याय नसेल. सध्या अॅपल 88 टक्के स्मार्टफोन्स हे आयात करुन भारतात विकतात. भारतात केवळ आयफोन SE ची निर्मिती बंगळुरुतील प्लांटमध्ये केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget