एक्स्प्लोर

Apple Event 2021 : iPhone 13 सीरीजसह लॉन्च होणार Apple प्रोडक्ट्स, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट?

iPhone 13 Launch Event : आज Apple चा बहुप्रतिक्षित लॉन्च इव्हेंट होणार आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह इतरही अनेक प्रोडक्ट्स लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

iPhone 13 Launch Event : Apple iPhone युजर्सची यावर्षीची प्रतिक्षा संपणार आहे. आज कंपनीचा यावर्षीचा मोठा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये iPhone 13 सीरीजसह अनेक प्रोडक्ट्स लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. कंपनीनं यंदाच्या लॉन्च इव्हेंटचं टायटल "California Streaming" असं ठेवलं आहे. या इव्हेंट्ससाठी इन्वाइट्सही पाठवण्यात आले आहेत. या मेगा इव्हेंटमध्ये सर्वांच्या नजरा कंपनीच्या नव्या आयफोनकडे लागल्या आहेत. याव्यतिरिक्त कंपनी आणखी काही प्रोडक्ट्स लॉन्च करण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया आज अॅपलचा हा मस्ट अवेटेड इव्हेंट किती वाजता पार पडणार? आणि युजर्स कुठे पाहू शकणार? 

कुठे आणि किती वाजता पाहू शकणार इव्हेंट?

Apple iPhone चा मेगा इव्हेंट "California Streaming" भारतीय वेळेनुसार, आज रात्री 10.30 वाजता आयोजित करण्यात येईल. जर तुम्हालाही या लॉन्च इव्हेंटमध्ये सहभागी व्हायचं असेल, म्हणजेच, हा इव्हेंट लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही कंपनीची वेबसाईट आणि कंपनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. 


Apple Event 2021 : iPhone 13 सीरीजसह लॉन्च होणार Apple प्रोडक्ट्स, कुठे आणि कसा पाहाल इव्हेंट?

Apple iphone 13 Series

Apple ची आगामी आयफोन 13 सीरिज लवकरच लाँच होणार आहे. ही सीरिज 14 सप्टेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी iphone 13, iphone 13 pro, iphone 13 Pro Max आणि iphone 13 Mini लॉन्च करु शकते. कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक लेटेस्ट फीचर्स आणत आहे, त्यातील सर्वात खास बात म्हणजे लो-अर्थ-ऑर्बिट (LEO) सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड. या विशेष तंत्रज्ञानाअंतर्गत, यूजर्स नेटवर्कशिवाय देखील कॉल आणि मेसेज करू शकतात. 

नेटवर्कशिवाय कॉल करणं शक्य 

अॅपल आयफोन 13 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये येणारे हे विशेष तंत्रज्ञानामुळे यूजर्सना 4G/5G नेटवर्क स्मार्टफोनमध्ये येतं की नाही याची चिंता करण्याची गरज नाही. कारण नेटवर्क नसेल तरी मेसेज पाठवण्याची आणि फोन कॉल करण्याची सुविधा या फोनमध्ये देण्यात येईल. जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे तर वापरकर्ते नेटवर्कशिवाय कोणालाही कॉल किंवा मेसेज पाठवू शकतील. अडचणीच्या वेळी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. Apple ने 2019 मध्ये LEO Satellite X iPhone ची अंमलबजावणी सुरू केली, परंतु कंपनी पहिल्यांदाच आपल्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे विशेष वैशिष्ट्य देत आहे.

नव्या स्मार्टफोनमधील फीचर्स

Apple चे हे iPhones iOS 15, A15 bionic वर काम करतील. यामध्ये, इमेज प्रोसेसिंगसाठी लिक्विड क्रिस्टल पॉलिमर सर्किट बोर्ड व्यतिरिक्त, नाईट मोड कॅमेरा दिला जाऊ शकतो. नवीन क्वालकॉम एक्स 60 मॉडेल आणि वायफाय 6 ई सपोर्ट मिळण्याची अपेक्षा आहे. 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मध्ये दिला जाऊ शकतो. यामध्ये 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. आयफोन 13 सीरिजला mmWave 5G साठी सपोर्ट मिळू शकतो. या वर्षी अनेक देशांना mmWave 5G कव्हरेज मिळणे सुरू होईल, जेणेकरून वापरकर्ते आयफोन 13 द्वारे हाय-स्पीड 5G कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील. इतर 5G नेटवर्कपेक्षा mmWave नेटवर्कवर इंटरनेट स्फीड जास्त उपलब्ध आहे. पण त्याची किंमत देखील जास्त आहे.

ही असू शकते किंमत

आयफोन 13 च्या किंमतीबद्दल बोलायचे तर हा फोन Apple कमी किंमतीत लाँच करेल. रिपोर्ट्सनुसार, आगामी सीरिजची किंमत आयफोन 12 पेक्षा कमी असेल. आयफोन 13 च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत $ 973 पर्यंत असेल म्हणजेच सुमारे 71,512 रुपये, जे आयफोन 12 च्या किंमतीपेक्षा 3,000 रुपयांपेक्षा कमी असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही आयफोन 13 चे 128 जीबी मॉडेल 1051 डॉलर म्हणजेच सुमारे 77,254 रुपयांमध्ये खरेदी करू शकाल. तसेच, 256GB व्हेरिएंटची किंमत $ 1174 म्हणजेच, 86,285 रुपये असू शकते. 

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती, महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज काय, वाचा पावसाची खबरबात
Embed widget