एक्स्प्लोर

अॅपलकडून iPad Pro लॉंच, भारतात वर्षअखेरीस येणार

आयपॅड प्रो 11 आणि 12.9 इंच अशा दोन व्हेरिअंटमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच अॅपलची अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप देण्यात आली आहे. अमेरिकेसह अन्य देशांमध्ये या आयपॅडची विक्री 7 नोव्हेंबर होईल. भारतामध्ये हा आयपॅड येण्यासाठी या वर्षाच्या शेवटाची वाट बघावी लागणार आहे.

न्यूयॉर्क: अॅपलने मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित शानदार सोहळ्यात आयपॅड प्रोचे दोन व्हेरिअंट लाँच केले. आतापर्यंतचे सर्वात कमी जाडीचे iPad Pro 11 इंच आणि iPad Pro 12.9 हे दोन आयपॅड लॉंच केले असून विशेष बाब म्हणजे यात कंपनीने फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला आहे. सोबतच बेजल, एनिमोजी, ए12एक्स प्रोसेसर, यूएसबी टाईप सी पोर्ट देखील दिला आहे. आयपॅड प्रो 11 आणि 12.9 इंच अशा दोन व्हेरिअंटमध्ये लिक्विड रेटिना डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच अॅपलची अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप देण्यात आली आहे. अमेरिकेसह अन्य देशांमध्ये या आयपॅडची विक्री 7 नोव्हेंबर पासून सुरु होईल. भारतामध्ये हा आयपॅड येण्यासाठी या वर्षाच्या शेवटाची वाट बघावी लागणार आहे. 11 इंचाच्या आयपॅडची किंमत 71,900 रुपये आणि 12.9 इंचच्या आयपॅड प्रो ची किंमत 89,900 रुपये आहे. आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविण्यात आले आहे. स्क्रीन साईज वाढविण्यासाठी हे करण्यात आले आहे. या आयपॅडची जाडी केवळ 5.9mm आहे.  सोबतच आयपॅड प्रो मध्ये पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन Xs सारखेच एक नॅनो सिम आणि दुसरे eSIM देण्यात आले आहे. भारतात सुरुवातीला रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून ही  सुविधा दिली जाणार आहेत. आयपॅड प्रोमध्ये 12 मेगापिक्सल चा रेयर कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये 4के व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट आहे. यामध्ये 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये कंपनीने 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. यासोबत 18 वॉटचा चार्जर दिला असून पॅडमध्ये 4 स्पीकर्स आहेत. या आयपॅडसोबत iPad Pro ची वेगळी पेन्सिल-2 असून पेन्सिलची किंमत 10,900 रुपये ठेवण्यात आली आहे.  iPad Pro ची वैशिष्टये  -  फेस आयडी टेक्नॉलॉजीचा सपोर्ट - आयपॅडमध्ये पहिल्यांदाच होम बटन हटविले - 10 तास बॅटरी बॅकअपचा दावा - पहिल्यांदाच ड्युअल सिम सपोर्ट - 12 मेगापिक्सलचा रेयर कॅमेरा, 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा - अद्ययावत प्रोसेसर A12X बायोनिक चिप - 8 वॉटचा चार्जर, 4 स्पीकर्स

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget