एक्स्प्लोर
Advertisement
आयफोनपेक्षा अँड्रॉईड स्मार्टफोन अधिक विश्वसनीय!
मुंबई : आयफोन ज्या टेक्नोसॅव्हीला आवडत नाही, असा शोधून सापडणार नाही. आयफोन घेण्याची ऐपत सर्वांमध्येच नसली, तरी पसंती काही कमी होत नाही. मात्र, एका रिपोर्टने आयफोनबाबत थोडं धक्कादायक सर्वेक्षण समोर आणलं आहे.
खरंतर आयफोन संपर्क किंवा इतर फीचर्ससाठी कमी आणि स्टेटस सिम्बॉलसाठी अधिक वापरला जातो. आयफोनचं अगदी सर्वात जुनं मॉडेल म्हणजे आयफोन 4 वगैरे असला, तरी ते स्टेटस सिम्बॉल होऊन जातं. म्हणजे, 'माझ्याकडे आयफोन आहे.' वगैरे. बस्स. या वाक्यानेच अंगात 'टेक्नो-ऊर्जा' संचारते आणि समोरच्यावरही प्रभाव पडतो. मात्र, आयफोनच्या या वैशिष्ट्याला हादरा देणारा एक रिपोर्ट समोर आला आहे.
अॅपलच्या आयफोन किंवा आयपॅडपेक्षा अँड्रॉईड स्मार्टफोन तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक सक्षम आहेत, असं म्हटलं जात आहे. शिवाय, एका टेक्नॉलॉजी ग्रुपच्या मतानुसार, अँड्रॉईड डिव्हाईसचे ऑपरेटिंग सिस्टम अॅपल ओएसपेक्षा अधिक वेगवान आहे.
आयफोनमध्ये इन्स्टॉल केलेले अॅप्स क्रॅस होतात. शिवाय, कनेक्शन आणि ओ्हर हीटिंगसारख्या समस्याही आयफोन यूझर्सना अनुभवयला आल्याचे वृत्त आहे. एका अभ्यासाअंती असं लक्षात आलंय की, आयफोन 6, आयफोन 5 एसमध्ये सर्वाधिक समस्या आहेत.
ओव्हर हीटिंग म्हणजेच डिव्हाईस गरम होण्याची समस्या आयफोनमध्ये अधिक दिसून येते. शिवाय, अॅपलचे 15 टक्के फोनमधील अॅप्स क्रॅस होत आहेत आणि 11 टक्के स्मार्टफोनमध्ये हेडफोनशी संबंधित प्रॉब्लेम आहेत. सर्वात जास्त क्रॅश होणाऱ्या अॅपमध्ये पहिल्या स्थानावर इन्स्टाग्राम अॅप आहे. शिवाय, स्नॅपचॅट अॅपच्या वापरामध्ये अडथळे दिसून येत आहेत.
ओव्हर हीटिंगमध्ये आयफोन चार्ज होण्यासही उशीर होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय, आयफोनचा स्क्रीन काळा पडणे, फ्लॅशलाईट कॅमेरा खराब होणे इत्यादी समस्यांनाही यूझर्सना सामोरं जावं लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement