एक्स्प्लोर
फेसबुकच्या साम्राज्यात आनंद चंद्रशेखरन यांची एन्ट्री

नवी दिल्ली : फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्या मेसेंजर अॅपसाठी स्ट्रॅटेजिक पदावर स्नॅपडीलचे माजी चीफ प्रॉडक्ट ऑफिसर आनंद चंद्रशेखरन यांची नियुक्ती केली आहे. आनंद यांच्या रुपाने फेसबुकच्या साम्राज्यात भारतीय माणसाची दमदार एन्ट्री झाली आहे. आनंद चंद्रशेखरन यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या नियुक्तीबाबत माहिती दिली. आनंद यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मी फेसबुक मेसेंजर प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी फेसबुकशी जोडला गेलो आहे आणि फेसबुकसोबत काम करण्यास प्रचंड उत्सुक आहे.” आनंद चंद्रशेखर 2011 पासून 2014 पर्यंत ‘याहू’मध्ये वरिष्ठ संचालक होते. त्यानंतर त्यांनी एअरटेल आणि स्नॅपडीलमध्ये वरिष्ठ पदांवरही काम केलं आहे.
Before You Go
Laxman Hake OBC Morcha: पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला





















