एक्स्प्लोर
फिटनेस चाहत्यांसाठी नवा स्मार्टबॅण्ड लाँच, किंमत 1799 रुपये
कम्प्युटर अॅक्सेसरीज कंपनी एमब्राननं नवा स्मार्टबॅण्ड एएफबी-11 फ्लेक्सी फिट नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टबॅण्डची किंमत फक्त 1,799 रुपये आहे.

मुंबई: कम्प्युटर अॅक्सेसरीज कंपनी एमब्राननं नवा स्मार्टबॅण्ड एएफबी-11 फ्लेक्सी फिट नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टबॅण्डची किंमत फक्त 1,799 रुपये आहे. या बॅण्डचा यूजर्सला बराच फायदा होऊ शकतो. कारण की, यूजरची दिवसभरातील शारीरिक हालचाल किती आहे आणि किती कॅलरीज कमी झाल्या याचा हिशोब हा बॅण्ड ठेवतो. एमब्रानचे संचालक गौरव दुरेजा यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, 'पॉवर बँक आणि ऑडिओ क्षेत्रात आम्ही स्वत:ला सिद्ध केल्यानंतर आता आम्ही वेयरेवल जगतात पाऊल टाकलं आहे. फिटनेस चाहत्यांना लक्षात घेऊन आम्ही हा बॅण्ड लाँच केला आहे. हे फिटनेस ट्रॅकिंग डिव्हाइस स्टायलिश कॉम्बिनेशनमध्ये तयार करण्यात आलं आहे.' फ्लेक्सी फिटला आयओएस किंवा अँड्रॉईड स्मार्टफोनशी जोडता येणार आहे. हा बॅण्ड वॉटर रेसिस्टेंट आणि डस्ट प्रूफ आहे. या स्मार्टबॅण्डमध्ये 60 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
नाशिक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















