एक्स्प्लोर
Advertisement
अमेझॉनचा सीईओ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्ती तब्बल...
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.
न्यूयॉर्क : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉनचा सीईओ जेफ बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. ब्लूमबर्ग आणि फोर्ब्सनं जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बेजोसला पहिलं स्थान दिलं आहे.
ब्लूमबर्गच्या मते, बुधवारपर्यंत बेजोसची संपत्ती 106 अब्ज डॉलर एवढी होती. तर फोर्ब्सनुसार त्याची संपत्ती 105 अब्ज डॉलर एवढी आहे.
याआधी हा विक्रम मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सच्या नावावर होता. 1999 साली त्याची संपत्ती 100 अब्ज डॉलर एवढी होती. पण आता बेजोसनं त्याचा विक्रम मोडीत काढला आहे. अमेझॉनच्या शेअरमधून बेजोसकडे सर्वाधिक संपत्ती जमा झाली आहे. 2017 मध्ये त्याचे शेअर जवळजवळ 57 टक्क्यांपर्यंत पोहचले होते.
दरम्यान, बिल गेट्स आजही श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याची एकूण संपत्ती 92 अब्ज डॉलर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement