एक्स्प्लोर
लेनोव्होच्या 2017 मधील सर्व स्मार्टफोनला 'नॉगट'ची अपडेट!
अँड्रॉईड नॉगट अपडेटमुळे यूझर्सला आणखी नवीन फीचर्स मिळतील, असं कंपनीने सांगितलं. आता लेनोव्होच्या स्मार्टफोनमध्ये मल्टी विंडो सपोर्ट मिळणार असल्याची माहितीही कंपनीने दिली. ज्यामुळे एकाच वेळी दोन अॅपचा वापर करता येईल.

नवी दिल्ली : झेड 2 प्लस आणि पी 2 सह 2017 या वर्षातील सर्व स्मार्टफोनला नॉगट 7.0 अपडेट जारी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशी माहिती लेनोव्होने सोमवारी दिली. अँड्रॉईड नॉगट अपडेटमुळे यूझर्सला आणखी नवीन फीचर्स मिळतील, असं कंपनीने सांगितलं. आता लेनोव्होच्या स्मार्टफोनमध्ये मल्टी विंडो सपोर्ट मिळणार असल्याची माहितीही कंपनीने दिली. ज्यामुळे एकाच वेळी दोन अॅपचा वापर करता येईल. लेनोव्होने मागील महिन्यात लाँच केलेल्या 'के 6 पॉवर' आणि 'के 6 नोट'साठी ही अपडेट दिली आहे. झेड प्लसचे यूझर्स आता आणखी चांगल्या पद्धतीने फोनचा वापर करु शकतात असं कंपनीने सांगितलं. लेनोव्होच्या या स्मार्टफोनमध्ये मॅन्युअल मोड, फिंगरप्रिंट अॅप लाँचिंग, स्क्रीन रेकॉर्डर आणि व्हिडीओ ओव्हर एलईटी या फीचर्सचा समावेश आहे.
Before You Go
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha





















