एक्स्प्लोर

एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा सुरु, डिशची गरज नाही

मुंबई : एअरटेलने आपल्या इंटरनेट टीव्ही सेवेची घोषणा केली असून, या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने 500 पेक्षा जास्त सॅटेलाईट चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच या सेवेतून तुम्हाला नेटफ्लिक्स, यूट्यूब, गूगल प्ले गेम्सचा आनंद टीव्हीवर घेता येणार आहे. विशेष म्हणजे, इंटरनेट हा इपीटीव्ही असल्यानं या नव्या सेवेला तुम्हाला डिशची गरज भासणार नाही. भारती एअरटेलचे सीईओ आणि संचालक सुनील तालदार यांनी सांगितले की, ''सध्या देशभरात 32 इंचापेक्षा मोठ्या स्क्रिनचे जवळपास तीन कोटी टेलिव्हीजन सेट आहेत. यापैकी एक कोटी ग्राहक स्मार्ट टीव्हीचा वापर करतात. एअरटेलच्या या नव्या सेवेत सेट टॉप बॉक्सच्या मदतीने उर्वरित टीव्हीदेखील स्मार्ट होऊ शकतील.'' तालदार पुढे म्हणाले की, ''यासाठी एअरटेलच्या सेट टॉप बॉक्सच्या सबस्क्रिप्शनसाठी वर्षाला 7,999 रुपये मोजावे लागतील. तर एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी 700 रुपये खर्च द्यावे लागतील. तसेच जुन्या सव्वा कोटी डीटीएच ग्राहकांना 3999 रुपये खर्च करुन, नवा सेट टॉप बॉक्स बसवता येईल. यात त्यांना एक महिन्यांचं सबस्क्रिप्शन मिळेल.'' या नव्या सेट टॉप बॉक्सवर इंटरनेटची सुविधा वायफायच्या माध्यमातून उपलब्ध होईल. या वायफाय सेवेसाठी तुमच्याकडे एअरटेलचं इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचं नाही. पण जर तुमच्याकडे एअरटलेचं इंटरनेट कनेक्शन असेल, आणि तुम्ही 999 पेक्षा अधिकचे पॅकेज वापरत असाल, तर तुम्हाला इंटरनेट टीव्हीसाठी 25 जीबीचा अतिरिक्त डेटा मोफत मिळेल. तुमच्याकडे एअरटेलचं इंटरनेट कनेक्शन नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कंपनीच्या इंटरनेट सेवेचाही वापर करु शकता. पण केवळ त्या कंपनीचा इंटरनेट स्पीड 4 एमबीपीएस असणं गरजेचं आहे. या नव्या सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून लाईव्ह टीव्ही तुम्हाला वेगळ्या अंदाजात पाहता येईल. यात तुम्ही लाईव्ह टीव्हीला पॉज करुन पाहता येईल. तसेच रिवाईंड आणि रेकॉर्डसारखे पर्याय यात उपलब्ध आहेत. शिवाय, बॉक्समधील ब्लू टूथच्या माध्यमातून मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवरील कंटेट टीव्हीवर पाहू शकता. तसेच गेम डाऊनलोड करुन कंसोलच्या मदतीने खेळू शकाल. विशेष म्हणजे, या नव्या सेट टॉप बॉक्सच्या रिमोटला तुम्ही तोंडीही कमांड देऊ शकता. दुसरं म्हणजे, नेटफ्लिक्स हे सेट टॉप बॉक्समध्ये पूर्वीपासूनच असलं तरी त्याच्या सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आधीपासूनच घेतलं असेल, तर त्याचा वापर सेट टॉप बॉक्ससाठी करु शकता. पण तुमच्याकडे इंटरनेट सुविधाच नसेल, तर दुसऱ्या डीटीएचप्रमाणे केवळ सॅटेलाईट चॅनेलच पाहू शकाल. आणि यासाठी तुम्हाला तुमच्या घरावर डिश लावावी लागेल. एअरटेलची ही नवी सुविधा बाजारात नवा ट्रेंड आणू शकते. दरम्यान, रिलायन्स जिओदेखील इंटरनेट टीव्ही सुरु करण्याच्या तयारीत आहे. जिओची ही नवी सेवा नव्या सुविधांसह बाजारात उतरेल, असा बाजारपेठेतील सूत्रांचं मत आहे. आगामी काळात जिओची सेवाही लवकरच सुरु होईल. जिओच्या टीव्ही सेवेलाही महिन्याच्या पॅकेजचे दर अतिशय कमी असतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
विद्यानंद बापटांचा भाषणाच्या सुरुवातीला प्रश्न, म्हणाले, 'इथे कोण कोण पेठेतून आलंय?' उत्तर मिळताच हसले अन् म्हणाले..
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
नऊ लाखाच्या बदल्यात 26 लाख घेऊन 25 लाखांची मागणी, सावकारी छळाला कंटाळून पतीनं विषाचा घोट प्याला; पत्नीला काळीज चिरणारा मेसेज, 'आता सहन होईना, मला माफ कर, तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण...'
Pune Ganesh Visarjan 2026 : दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांनाच पोरांनी मिरवणुकीत डीजेवर नाचवलं, पुण्यातील गणेश विसर्जनाचा व्हिडीओ व्हायरल
Ashutosh Ranka: आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
आसाममध्ये आशुतोष रांकांसह सीजेपीचे अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अभिजीत दीपके हिमंता सरकारवर संतापले
Mumbai Goregaon Toilet death: शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
शौचालयाच्या बाजूच्या कारखान्यातील विषारी वायू ड्रेनेजमधून आत शिरला, दोघांचा गुदमरुन मृत्यू, गोरेगावातील धक्कादायक घटना
Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
पुणे गणेश विसर्जन मिरवणूक 33 तास 33 मिनिटांनंतर संपन्न; गतवर्षाच्या तुलनेत सव्वातास आधीच सांगता, गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत चाललं
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
Embed widget