एक्स्प्लोर
एअरटेलचा 4G फोन लवकरच बाजारात येणार!
रिलायन्स जिओचा 4जी फीचर फोन लवकरच बाजारात येणार आहे. त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलही आता 4जी फोन लाँच करण्याच्या विचारात आहे.

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेल आपला नवा 4G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी एअरटेलनं स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांशी चर्चाही सुरु केली आहे. एअरटेलचा हा फोन दिवाळीपर्यंत लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनची किंमत 2,500 रुपयांपर्यंत असू शकते. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनसोबत अधिक डेटा आणि फ्री कॉलिंग देऊ शकतं. हा स्मार्टफोन कंपनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे. हा फोन सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होऊ शकतो. एअरटेल यासाठी कार्बन आणि लावा या स्मार्टफोन मेकर कंपन्याशी चर्चा करत आहे. दरम्यान, दूरसंचार कंपनी आयडिया सेल्यूलर देखील आपल्या 4जी फोनवर सध्या काम सुरु आहे. हा फोन देखील लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
महत्त्वाच्या बातम्या
बीड
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण






















