एक्स्प्लोर
Advertisement
एअरटेलचा धमाकेदार प्लान, तब्बल 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
मुंबई: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान आणला आहे. या प्लाननुसार, यूजर्सला दररोज 1 जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. एअरटेलच्या या प्लानची किंमत 345 रुपये असणार आहे. यामध्ये यूजर्सना 500 एमबी डेटा दिवसा आणि 500 एमबी डेटा रात्री मिळणार आहे. तसंच 28 दिवस याची व्हॅलिडिटी असणार आहे.
ही ऑफर 31 मार्चपर्यंत 4जी यूजर्स घेऊ शकतात. 31 मार्चच्या आधी ही ऑफर घेणाऱ्या यूजर्संना 345 रुपये किंमतीत पुढील 11 महिने हा प्लान घेता येईल.
दुसरीकडे वोडाफोननं देखील 346 रुपयात 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असा नवा प्लान लाँच केला आहे. मागील महिन्यात जिओनं 303 रुपयात यूजर्सला 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग याची घोषणा केली आहे.
तर आयडीयानंही 345 रुपयात 14जीबी 4जी डेटा आणि अनलिमिटेड टेरिफ प्लानची घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या:
व्होडाफोनचा 346 रुपयात दररोज 1 जीबी 4G डेटा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement