एक्स्प्लोर
जिओनंतर आता एअरटेलचीही VoLTE सेवा, मुंबईतून सुरुवात
VoLTE सेवेमुळे ग्राहकांना आता डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. यापूर्वी डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग देणारी जिओ ही भारतातील एकमेव कंपनी होती.

मुंबई : रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे. मुंबईतून या सेवेला सुरुवात करण्यात आली. VoLTE सेवा देणारी एअरटेल भारतातील दुसरी दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलचे 26 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्युशन म्हणजे VoLTE सेवेमुळे ग्राहकांना आता डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. यापूर्वी डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग देणारी जिओ ही भारतातील एकमेव कंपनी होती. VoLTE सेवा सध्या केवळ मुंबईतील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही सेवा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही, असं एअरटेलने म्हटलं आहे. जिओची VoLTE सेवा केवळ 4G नेटवर्कवरच उपलब्ध आहे. मात्र एअरटेलचे 2G आणि 3G ग्राहकही डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची अडचण येणार नाही. ही टेक्निक केवळ एअरटेलकडेच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग






















