एक्स्प्लोर
Advertisement
एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा
मुंबई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर वाढलेल्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी बड्या कंपन्यांनी ग्राहकांसाठी ऑफर्सची खैरात देऊ केली आहे. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलनं आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी मान्सून ऑफर जाहीर केली आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांना या ऑफर अंतर्गत तीन महिन्यांसाठी 30 जीबी मोफत 4जी डेटा देणार आहे. जिओच्या धन धना धन ऑफरला टक्कर देण्यासाठी ही ऑफर एअरटेलनं दिल्याचं बोललं जात आहे.
एअरटेलनं मान्सून ऑफरअंतर्गत आपल्या पोस्टपेड ग्राहकांना दर महिन्याला 10 जीबी डेटा देऊ केला आहे. जिओप्रमाणे याआधी एअरटेलनं एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळासाठी 30 जीबी डेटा दिला होता. आता याच ऑफरचं नाव मान्सून ऑफर करण्यात आलं आहे.
एअरटेलच्या पोस्टपेड ग्राहकांना ही योजना मिळवण्यासाठी माय एअरटेल अपमध्ये जाऊन रिक्वेस्ट टाकावी लागणार आहे. यानंतर 1 जुलैपासून पुढील 3 महिन्यांसाठी ग्राहकांना एकूण 30 जीबी मोफत डेटा मिळवता येईल. जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननंही ग्राहकांना आकर्षक ऑफर दिल्या होत्या. तर जिओनं धन धना धन ऑफरसोबतच 45 जीबी 4जी डेटाची ऑफर दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बीड
राजकारण
Advertisement