एक्स्प्लोर
Advertisement
84जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; Airtel आणि ideaचा नवा प्लॅन!
या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
मुंबई : रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी नवनवे प्लॅन लाँच करत आहेत. जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेलनं 495 रुपये किंमतीचा नवा प्लॅन आणला आहे.
या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. हा प्लॅन 84 दिवसांसाठी वैध असणार आहे. ज्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेल आणि आयडियाच्या या प्लॅनमध्ये दररोज 300 मिनिट आणि एका आठवड्यात 1200 मिनिटांपर्यंत फ्री कॉलिंग आहे. हा प्लॅन नव्या प्रीपेड यूजर्ससाठी असणार आहे.
रिलायन्स जिओच्या 399 रुपयाच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. जर तुम्ही नवे यूजर असाल तर तुम्हाला 99 रुपयात जिओची मेंबरशीप घ्यावी लागेल. म्हणजेच या प्लॅनसाठी तुम्हाला 498 रुपये मोजावे लागतील.
दरम्यान, याशिवाय एअरटेलनं 549 आणि 999 रुपये किंमतीचे दोन नवे प्लॅनही लाँच केले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 2जीबी आणि 4 जीबी डेटा दररोज मिळणार आहे.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सोलापूर
मुंबई
मुंबई
Advertisement