VI 5G Service: रिलायन्सच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM 2022) 5G बाबत घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर दूरसंचार कंपनी एअरटेलनेही लवकरच 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. Jio आणि Airtel नंतर आता Vodafone-Idea (Vi) ने देखील 5G ​​बद्दल घोषणा केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रविंदर ठक्कर यांनी सांगितले की, कंपनी लवकरच 5G सेवा सुरू करण्याची घोषणा करेल. 5G स्पेक्ट्रम खरेदी करण्याच्या यादीत Jio आणि Airtel नंतर Vi तिसऱ्या क्रमांकावर आहे.


Vi ग्राहकांना करावी लागेल प्रतीक्षा 


माध्यमांशी बोलताना रविंदर ठक्कर यांनी 5G लॉन्च करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ग्राहकांची मागणी, आवश्यकता आणि स्पर्धात्मक डायनॅमिक यासारख्या विविध बाबी लक्षात घेऊन कंपनी 5G लॉन्च करण्याचा निर्णय घेईल. आता Vi ग्राहकांना 5G सेवेसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. असा अंदाज आहे की Vi 2023 ते 2024 दरम्यान 5G सेवा सुरू करू शकते.


दिवाळीत जीओची 5G सेवा होणार सुरू


Jio ची 5G सेवा दिवाळीपर्यंत म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. पहिल्या टप्प्यात जिओ दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये 5G आणणार आहे. यानंतर कंपनी डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात आपली 5G सेवा सुरू करू शकते.


भोपाळमध्ये झाली VI ची 5G चाचणी 


Vi ने याच वर्षी जुलैमध्ये ट्रायच्या सहकार्याने भोपाळमध्ये 5G ची चाचणी घेतली होती. चाचणी दरम्यान, व्होडाफोन आयडिया (VI) नेटवर्कवर 1 Gbps चा वेग आढळला. 5G चाचणी करणारे भोपाळ हे देशातील पहिले शहर बनले आहे.


दरम्यान, रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ 5G इंटरनेट सेवा सुरू होणार असल्याची घोषणा केली. त्याशिवाय रिलायन्सकडून देशातील स्वस्तातील 5G स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. या स्वस्त दरातील स्मार्टफोनसाठी रिलायन्सने जगातील दिग्गज आयटी कंपन्यांसोबत भागिदारी केली आहे. मेड इन इंडिया 5G इंटरनेट सेवेसाठी मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सिस्को सारख्या दिग्गज टेक कंपन्यांसोबत भागिदारी केली असल्याचे मुकेश अंबानी यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


तुमच्या मोबाईलमध्ये 5G सेवा चालणार का? की त्यासाठी नवीन फोन घ्यावा लागेल? असं तपासा
Airtel ची 5G सेवा कधी सुरू होणार? सुनील मित्तल यांनी दिलं उत्तर