Google Meet New Feature Released : गुगल मीट (Google Meet) युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कंपनीनं नवीन फिचर (New Feature) आणलं आहे. कंपनीनं म्हटलं आहे की, हे नवं फिचर युजर्ससाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या नवीन फिचरमुळे युजर्सना व्हिडीओ कॉल म्युट आणि अनम्युट करणं सोपं होणार आहे. युजर्स स्पेसबार बटणाचा (Spacebar Key) वापर करून आता म्युट (Mute) करु शकतील आणि पुन्हा स्पेसबार वापरल्यास कॉल अनम्युटही (Unmute) करता येईल. या नवीन फिचरमुळे गुगल मीटचा वापर करणं आणखी सोपं होणार आहे.
नवे फिचर युजर्ससाठी सोयीस्कर
रिपोर्टनुसार, कंपनीनं म्हटलं आहे की, स्पेसबारचा वापर करुन आता युजर्सला म्युट आणि अनम्युट करता येणार आहे. हे फिचर युजर्ससाठी सोयीस्कर ठरेल. अनके वेळा युजर्स व्हिडीओ कॉल अनम्युट केल्यानंतर म्युट करायला विसरतात. अशा वेळी फक्त स्पेसबारचा वापर करुन म्युट किंवा अनम्युट करता येईल. हे फिचर डिफॉल्ट सेटींग्समध्ये बंद असेल. मात्र हे फिचर ऑन केल्यावर तुम्हाला स्पेसबारचा वापर करुन म्युट किंवा अनम्युट करता येणार आहे.
गुगल मीटसाठी व्हॉइस कंट्रोल सेटिंग्जमध्येही बदल
गुगलने Google Meet मध्ये आणखी एका फीचरच्या अपडेटबद्दल सांगितलं आहे. आता Google Meet हार्डवेअरसाठी 'Hey Google' व्हॉइस कंट्रोलची (Voice Control Setting) सेटिंग देखील अपडेट करण्यात आली आहे. या अपडेटसह, Google Assistant आता फक्त तेव्हा सक्रिय होईल जेव्हा कोणतंही डिवाईस मीटिंगमध्ये नसेल.
गुगलकडून आणखी एक फीचर लाँच
गुगलने सोमवारी आणखी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. या फिचरमुळे तुम्हाला उच्च-कार्यक्षमतेनं कस्टम फंक्शन तयार करण्याची परवानगी देईल. यामध्ये युजर्स आता व्हिजिटर शेअरिंगचा वापर करू शकतात Google नसलेल्या संस्था आणि युजर्सच्या मालकीच्या शेअर ड्राइव्हमधील फाईल Google Workspace वर अपलोड किंवा स्टोर करु शकतील.