एक्स्प्लोर
60 जीबी डेटा फ्री, Vodafoneची नवी ऑफर
या ऑफरमध्ये यूजर्सला प्रत्येक महिन्याला 10 जीबी डेटा पुढील सहा महिन्यांसाठी मिळणार आहे. म्हणजेच तब्बल 60 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
मुंबई : जिओ आणि एअरटेलनं आपल्या पोस्टपेड यूजर्सला फ्री डेटा ऑफर दिली आहे. त्यामुळे आता व्होडाफोननं देखील अशाच एका ऑफरची घोषणा केली आहे. व्होडाफोन आपल्या पोस्टपेड यूजर्सला 60 जीबी फ्री डेटा देणार आहे. ही ऑफर सर्व व्होडाफोन रेड यूजर्ससाठी असणार आहे.
या ऑफरमध्ये यूजर्सला प्रत्येक महिन्याला 10 जीबी डेटा पुढील सहा महिन्यांसाठी मिळणार आहे. म्हणजेच तब्बल 60 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. व्होडाफोन रेड प्लॅन 499 रुपयांपासून सुरु होतो. ज्यामध्ये फ्री डेटाशिवाय 5 जीबी डेटा मिळणार आहे.
रिलायन्स जिओ बाजारात आल्यापासून स्वस्त डेटा आणि फ्री कॉलिंग असे नवे प्लॅन यूजर्ससाठी आणले गेले. त्यामुळेच या कंपन्यांनी आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठीही स्वस्त प्लॅन आणले आहेत.
दुसरीकडे एअरटेल टीव्ही आणि जिओ टीव्हीला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं देखील आपल्या काही खास प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सब्सक्रीप्शन मोफत देत आहे.
1299 आणि 1699 रुपयांच्या प्लॅनवर दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्सचं सब्सक्रीप्शन मिळेल. नुकतंच एअरटेलनंही आपल्या पोस्टपेड यूजर्ससाठी 60 जीबी फ्री डेटा ऑफर आणली होती.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement