एक्स्प्लोर

5G स्पेक्ट्रमचा लिलाव भारतातील मोबाईल कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरणार?

देशात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात 5G सेवा मिळावी यासाठी सरकारकडून लवकरच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे

नवी दिल्ली : देशातील इंटरनेट सेवेचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आता आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. देशात सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात 5G सेवा मिळावी यासाठी सरकारकडून लवकरच 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहे. मात्र हा लिलाव देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींसाठी डोकेदुखी बनल्याची चर्चा आहे. 5 जी सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला 5.8 लाख कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या स्पेक्ट्रमच्या खरेदीसाठी रिलायन्स जिओसह व्होडाफोन-आयडीया आणि एअरटेल यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा लिलाव या कंपनीची मालकी असलेल्या देशातील श्रीमंत व्यक्तींना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. 5G सेवेचे भविष्यातील फायदे लक्षात घेता लाखो कोटी रुपये गुंतवणुक करण्यासाठी प्रत्येक कंपनी प्रयत्न करणार असल्याचा अंदाज आहे. 5G सेवेमुळे वेगवान इंटरनेटसह स्ट्रीमिंग, गेमिंग आणि इतर ऑनलाइन सेवांमध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीला या स्पर्धेत मागे राहणे परवणार नाही. 5G सेवा न देऊ शकणाऱ्या कंपनीसाठी आपल्याकडील ग्राहक टिकवणे अवघड होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक कंपनीला या स्पर्धेत टिकून राहणे आवश्यक आहे. 5जी तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडू शकतात. या क्षेत्रातील अडचणींवर या तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना करता येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर देशात 5G इंटरनेट सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 'डिजीटल कम्युनिकेशन्स कमिशन'कडून या लिलावाबाबतची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यानूसार 2019 या वर्षाच्या शेवटपर्यंत 8600MHz क्षमतेच्या स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Embed widget