एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
300 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन
एअरटेलनं आपल्या यूजर्ससाठी तब्बल 300 जीबी 4जी डेटा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 360 दिवसांसाठी वैध असणारआहे.
![300 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन 300gb data and unlimited calling airtel launches new plan 300 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरटेलचा नवा प्लॅन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/03213115/airtel-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एअरटेलनं नुकताच एक प्लॅन लाँच केला आहे. एअरटेलनं आपल्या यूजर्ससाठी तब्बल 300 जीबी 4जी डेटा प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 360 दिवसांसाठी वैध असणारआहे. यासोबतच दररोज 100 मेसेज आणि अनलिमिटेड कॉलिंगही यामध्ये मिळणार आहे.
या प्लॅनची किंमत 3,999 रुपये असून हा प्लॅन जवळजवळ वर्षभरासाठी असणार आहे. या प्लॅनची खासियत म्हणजे यूजर दिवसाला किती डेटा वापरु शकतो. म्हणजेच दिवसाला कोणतीही डेटा मर्यादा यूजर्सला नाही.
इतकंच नव्हे तर एअरटेलनं 1,999 रुपयांच्या प्लॅन देखील लाँच केला आहे. ज्यामध्ये यूजर्सला 180 दिवसांसाठी 125 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्येही दररोज वापरासाठी डेटा लिमिट नाही.
दरम्यान, नुकतंच एअरटेलनं 349 रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सला 28 दिवसांसाठी दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. आधी या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा देण्यात येत होता. त्यामुळे 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता यूजर्सला 42 जीबी डेटा मिळणार आहे.
(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)