Case Against Tiktok : फिलाडेल्फिया देशात टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिकटॉकवर मिळालेल्या एका चॅलेंजमध्ये 10 वर्षांची मुलगी ब्लॅकआउट गेम खेळत होती, त्यादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी टिकटॉकवर निष्काळजीपणा करत चुकीच्या पद्धतीने मार्केटिंग केल्याचा आरोप केला आहे.
नायला घरी बेशुद्धावस्थेत आढळली
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नायला अँडरसन नावाच्या मुलीशी संबंधित आहे. नायला 10 वर्षांची आहे. ती खूप हुशार विद्यार्थिनी होती आणि तीन भाषा बोलू शकत होती असे सांगण्यात येत आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, नायला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर खूप सक्रिय होती आणि व्हिडिओ देखील बनवायची. 7 डिसेंबरला ती फिलाडेल्फिया येथील तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. नायलाला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.
टिकटॉकवर आरोप
नायलाचे वडील अँडरसन यांनी आरोप केलेत की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत चुकीच्या उत्पादनांची मार्केटिंग करत आहे, ज्याचा मुलांच्या मानसिकतेवर खूप मोठा परिणाम होत आहे. त्यांनी तक्रारीत सांगितले की, नायलाच्या फॉर यू पेजवर अशा अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत. दरम्यान, ती ब्लॅकआउट चॅलेंजच्या आहारी गेल्याचे दिसून आले. आणि हे मुलीच्या मृत्यूचे कारण आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले. मात्र, टिकटॉकने याबाबत अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. नायलाच्या मृत्यूच्या वेळी, टिकटॉकने शेवटचे विधान जारी केले होते, ज्यात म्हटले होते की, ब्लॅकआउट चॅलेंज टिकटॉकने सुरू केलेले नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या आकाराच्या हिऱ्याची विक्री, किंमत माहित आहे का?
- Viral Video : 'या' चिमुकल्याचा स्वॅग पाहा, झोपाळ्यावर बसण्यासाठी लावली अनोखी शक्कल
- Viral Video : वाघावर भारी पडला कुत्रा, पाहा थक्क करणारा व्हिडीओ
- Trending : जगातला सर्वाधिक महागडा उंट, सौदी अरेबियात झाला इतक्या रक्कमेला लिलाव