Biggest White Diamond : जगातील सर्वात मोठ्या हिऱ्याची बुधवारी एका लिलावात विक्री झाली आहे. या पांढऱ्या शुभ्र हिऱ्याचं नाव 'द रॉक' (The Rock Diamond) असं आहे. या हिऱ्याची जिनिव्हामध्ये बुधवारी लिलावात 18.8 दशलक्ष डॉलर म्हणजेच 1 अब्ज, 43 कोटी, 86 लाख, 38 हजार, 40 रुपयांमध्ये विक्री झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या आकाराचा हिरा असल्याने हा हिरा मोठ्या किंमतीला विकला जाईल अशी अपेक्षा होती. 


या हिऱ्याची विक्री झाल्यास बरेच विक्रम मोडीत निघतील अशी अपेक्षा होती. मात्र, अशा दागिन्यांच्या विक्रमापेक्षा ही किंमत खूपच कमी मानली जातं आहे. स्विस शहरात 2017 मध्ये 163.41 कॅरेटचा सर्वात महागडा हिरा 33.7 दशलक्ष डॉलर किंमतीला विकला गेला होता. द रॉक' हिरा हा जागतिक विक्रम मोडेल अशी खूप आशा होती. मात्र, या हिऱ्याची अपेक्षेपेक्षा कमी किमतीला विक्री झाली.


'द रॉक' (The Rock Diamond) हा जगाील सर्वात मोठ्या आकाराचा पांढरा हिरा आहे. हा हिरा 228.31 कॅरेटचा असून आकाराने एका गोल्फ बॉलपेक्षा मोठा आहे. या जिनेव्हा येथील क्रिस्टीच्या लिलावगृहामध्ये बुधवारी या हिऱ्याचा लिलाव पार पडला. 14 दशलक्ष फ्रँकपासून सुरू झालेली बोली दोन मिनिटांनंतर 18.6 दशलक्ष फ्रँकवर थांबली. कर आणि खरेदीदाराचा प्रीमियम जोडल्यानंतर किंमत 19 ते 30 दशलक्ष स्विस फ्रँक एवढी होईल.


'द रॉक' एक सममितीय बदामाच्या आकाराचा हिरा आहे. हा उत्तर अमेरिकेतील एका व्यक्तीकडे होता. Htel des Burgess येथे केलेल्या कारवाईनंतर लिलाव करणाऱ्या व्यक्तीने हा हिरा विकत घेतला. जिनव्हा येथील क्रिस्टीच्या लिलावगृहातील दागिने विभागाचे प्रमुख मॅक्स फॉसेट यांनी सांगितले की, द रॉक सारख्याच आकाराचे आणि दर्जाचे काही हिरे आहेत.


2000 च्या दशकाच्या सुरुवातीला खाणीत सापडला हिरा
हा हिरा 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील एका खाणीतून काढण्यात आला होता. जिनेव्हामध्ये लिलाव होण्यापूर्वी हा हिरा दुबई, तैपेई आणि न्यूयॉर्कमध्ये नेण्यात आला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या