Viral Video : अनेक वेळा काही प्राण्यांची मोठ्या किंमतीला विक्री झाल्याचे ऐकायला मिळालं आहे. याच संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका उंटाची लिलावामध्ये मोठ्या किंमतीत विक्री झाली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या उंटाची लिलावात लागलेली बोली ऐकून तुम्हीही थक्क व्हाल


'गल्फ न्यूज' रिपोर्टनुसार सौदी अरेबियामध्ये एका उंटाच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये उंटाचा लिला सुरु आहे. लिलावाच्या ठिकाणी लोक पारंपारिक पोषाखामध्ये दिसून येत आहेत. 


या उंटाचा लिलाव करताना सुरुवातीच्या बोलीची किंमत 10 कोटी 60 लाख रुपये ठेवण्यात आली होती. यांनंतर बोली वाढून या उंटावर 14 कोटी 23 लाख रुपयांची बोली लावण्यात आली. ही बोली अखेर ठरली आणि या उंटाचा 14 कोटी 23 लाख रुपयांमध्ये लिलाव करण्यात आला.






 


दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये लिलावात उंट कोणी खरेदी केला, याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र एवढ्या महागड्या किंमतीत खरेदी करण्यात आलेल्या उंटाची आता सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. 


या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा लिलाव करण्यात आलेला उंट दुर्मिळ प्रजातीचा आहे. या जातीचा उंट त्याचे सौंदर्य आणि वेगळेपणामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या प्रजातीचे उंट जगात क्वचितच आढळतात. सौदी अरेबियात उंट मेळा भरतो. या दरम्यान उंटांटी बोली लावण्यात येते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :