एक्स्प्लोर

मोसंबीचेही भाव कोसळले, शेतकरी पुन्हा अडचणीत

जालना : तूर, कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांपाठोपाठ राज्यात मोसंबी उत्पादक शेतकरीही मेटाकुटीला आला आहे. मोसंबीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी मोसंबीचा भाव घसरल्याने हतबल झाला आहे. पाच महिन्यांपूर्वी 39 हजार रुपये प्रति टन एवढा भाव असलेल्या मोसंबीला आज फक्त किमान 2 हजार ते 6 हजार एवढा भाव मिळतोय. एकेकाळी काबाड कष्टाने जोपासलेली बाग दुष्काळामुळे कापून टाकण्याची वेळ आली होती. आता मात्र चांगला सुकाळ झाल्याने बाजारभावाअभावी ही झाडं कापून टाकावी की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मोसंबीचं आगार समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीला 5 महिन्यांपूर्वी 39 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला. मात्र आजघडीला आवक वाढल्याने हाच भाव कमीत कमी दोन हजार आणि जास्तीत जास्त सहा रुपये प्रति टनांवर येऊन ठेपला आहे. बाजारभाव नसल्याने मोसंबी झाडावरच वाळली! जालन्यातील मोतीगव्हान गावचे मोसंबी उत्पादक शेतकरी वामन मोहिते यांनी यंदा आपल्या मोसंबी बागेवर फवारणी, खते, खुरपणी यावर अगणित खर्च केला. पण काबाडकष्ट घेऊन देखील वामन मोहिते आपल्या बागेतील झाडांना लागलेल्या मोसंबीचं एक फळही विकायला तयार नाहीत. कारण यंदा तूर, कांदा, द्राक्ष आणि डाळींबाच्या भावासारखेच हाल मोसंबीचेही चालू आहेत. 2 ते 6 हजार रुपये प्रति टनाच्या पलीकडे एकही व्यापारी मोसंबी खरेदी करायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची मोसंबी झाडांवरच वाळायला लागलीये. केशव मोहिते या मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचीही हीच अवस्था आहे. गेल्या वर्षीचा चांगला पाऊस पाहता चांगलं उत्पन्न निघेल या आशेने त्यांनी खत फवारणीवर खर्च केला. अर्थात त्यांच्या मेहनतीला चांगलं फळ देखील मिळालं. त्यांना अवघ्या अडीचशे झाडांना 15 टन माल निघाला. मात्र बाजारभाव कोसळल्याने त्यांचं उत्पन्न बरोबरीत सुटलं आहे. मागच्या वर्षी दुष्काळ असताना त्यांच्याकडे चार पैसे उरले होते. मात्र यंदा त्यांना सुकाळानेच मारलं आहे. जालना बाजार समितीत मोसंबीचे ढिग जालना बाजार समितीच्या प्रांगणात शेकडो क्विंटल मोसंबीचा खच पडलेला आहे. शेतकऱ्यांनी मोसंबी विकायला आणली. पण 2 ते 6 हजार रुपये टन भाव मिळत असल्याने खर्चही निघत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी मोसंबी न विकता ती तिथेच सोडून दिली. त्यामुळे आजघडीला बाजार समितीच्या प्रांगणात मोसंबीचे ढिग तसेच पडून आहेत. जालना जिल्ह्यातील प्रत्येक मोसंबी उत्पादक शेतकऱ्याचे आजघडीला हेच हाल आहेत. त्यामुळे मोसंबी विकून घरात लाखो रुपयांचं भांडवल खेळण्याऐवजी दारिद्र्य दिसायला लागलं आहे. यंदा तूर, कांदा, द्राक्ष, डाळिंब, आंबे आणि मोसंबी ही सगळी फळं एकाच वेळी बाजारात आली. 2012 आणि 2013 ला दुष्काळाच्या फटक्याने कसंबसं सावरलेल्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीच्या चांगल्या पावसाने तारलं. साहजिकच जून-जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी मृगबहराचं नियोजन केलं. त्यामुळे यावर्षी चांगलं उत्पादन झालं आहे. जालना बाजार समितीमध्ये मागच्या दोन महिन्यात म्हणजेच मार्च-एप्रिलमध्ये 22 हजार ते 25 हजार क्विंटल एवढी आवक झाली. सद्य परिस्थितीत हीच अवस्था कायम असल्याने भाव आणखी कोसळले आहेत. मोसंबीलाही शासनाने आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. जालना जिल्ह्यातील हजारो हेक्टर बागा 2012 -2013 च्या दुष्काळात नष्ट झाल्या. कशाबशा जगवलेल्या बागांना निसर्गाची साथही मिळाली. पण आता चांगलं उत्पादन होऊनही मालाचे ढीग सोडून जाण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shubh Yog: आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Horoscope Today 20 August 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; आजचे राशीभविष्य
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget