मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने मोठा खुलासा केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घराची लाईट बंद होती. फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या असंही या महिलेनं सांगितलं.


महिलेने दावा केला की, 13 जूनच्या रात्री सुशांतच्या फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारची पार्टी झाली नाही. या संपूर्ण घटनेत काहीतरी गडबड आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआय याप्रकरणी महिलेची आणखी चौकशी करत आहे. मात्र सीबीआय या महिलेची आजच चौकशी करणार नंतर चौकशी याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही.


महिलेची माहिती महत्त्वाची काय?


कोणत्याही शेजाऱ्याचं आपल्या शेजारी राहणाऱ्यांकडे बारीक लक्ष असतं. त्यांच्या अनेक हालचालींवर शेजाऱ्यांचं लक्ष असतं. या महिलेने स्वत: मीडियासमोर येऊन ही माहिती दिली आहे.


आज दुपारी 2.25 वाजता सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सीबीआयची टीम सीन ऑफ क्राईम रिक्रिएट करणार आहे. यासाठी सीबीआयने सर्व सामानही सोबत आणलं आहे. यावेळी सीबीआयने मुंबई पोलिसांच्या टीमला बाहेर उभं राहण्यास सांगिलं आहे, अशी माहिती मिळत आहे.


सीबीआय अधिकार्‍यांकडून सुशांत राहत असलेल्या अपार्टमेंटची पाहणी सुरु आहे. काही अधिकाऱ्यांनी इमारतीच्या शेवटच्या फ्लॅटवरील गच्चीवर जाऊन देखील संपूर्ण परिसराची पाहणी केली आहे. सुशांत राहत असलेल्या खोलीत फॉरेन्सिक लॅब डॉक्टर्सही पोहोचले आहेत. सीबीआयच्या टीमने सिद्धार्थ पिठानी, दीपेश आणि नीरज यांना सोबत आणलं आहे. घटना घडली त्यावेळी सिद्धार्थ, दीपेश आणि नीरज सुशांतसोबत उपस्थित होते.


संबंधित बातम्या