एक्स्प्लोर
सहा जातींच्या द्राक्ष लागवड, सव्वा कोटीचं उत्पादन

सांगली : द्राक्षाचं आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील तासगाव तालुक्यात दिवसेंदिवस द्राक्षाच्या बागा वाढत आहेत. याच तालुक्यातील जरंडीचे लक्ष्मण शिंदे यांनी ग्राहकांच्या चवीचा, मागणीचा बारकाईने अभ्यास करुन सहा जातींच्या द्राक्षांची लागवड केली आहे. सध्या या द्राक्षांची देशविदेशात निर्यात करुन ते सव्वा कोटीचं उत्पन्न घेत आहेत. शिंदे यांनी 19997 मध्ये बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेती करण्यास सुरुवात केली. पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी एक एकरावर द्राक्ष बाग घातली. दर्जेदार द्राक्षाच्या उत्पादनामुळं उत्पन्न मिळत गेलं, आणि लक्ष्मण शिंदे यांनी मिळणाऱ्या नफ्यातून द्राक्षबागा वाढवली. आज त्यांची तब्बल 19 एकर द्राक्ष बाग पसरलेली आहे. यातील सहा एकरावर सोनाका, चार एकरावर माणिकचमन, दोन एकरावर क्लोन, दोन एकरावर थॉमसन, एक एकरावर तास-ए-गणेश आणि तीन एकरावर सुपर सोनाका अशा सहा जातींच्या द्राक्षांची लागवड करत आहेत. त्यांच्या द्राक्ष उत्पादनांना सध्या बाजारात चांगली मागणी आहे. यंदा त्यांना द्राक्षाच्या सहाही जातींच्या वाणानुसार 42 ते 75 रुपये किलोपर्यंत द्राक्षांना दर मिळाले आहेत. याच्या विक्रीतून त्यांनी 1 कोटी 8 लाख 30 हजार रुपये कमावलेत. यातील चाळीस लाखाचा खर्च वजा जाता त्यांना 68 लाख 30 हजार रुपयाचं निव्वळ उत्पन्न मिळालं आहे. यावर्षी वातावरण चांगलं राहिल्यानं औषधांचा खर्च तुलनेनं कमी आला. उत्पादन चांगलं मिळालं असलं तरी, मात्र प्रत्येक वर्षी शेवटच्या टप्यात द्राक्षाचे दर वाढतात. यावेळी मात्र ते वाढले नसल्याचं लक्ष्मण शिंदे सांगतात. अठरा एकराच योग्य नियोजन करुन ते द्राक्षाचं उत्पादन घेत असल्यानं त्यांच्यासाठी शेती म्हणजे वरदानच ठरली आहे.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
भविष्य






















