एक्स्प्लोर

Dhapewada Yatra : प्रतिपंढरीच्या वारीसाठी एसटी महामंडळाची लालपरी सज्ज, पाच आगारातून 47 बसेसची व्यवस्था

आषाढी एकादशीच्या तिसऱ्या दिवशी धापेवाड्यात मोठी दर्शनजत्रा भरते. यंदा जत्रा 12 ते 14 जुलै दरम्यान भरणार. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील 5 आगारांतील 47 बसेस यात्रा स्पेशल म्हणून सज्ज आहेत.

Nagpur : विदर्भवासीयांची पंढरी आणि प्रतिपंढरपूर म्हणून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाड्यात जत्रेची जोरदार तयारी झाली आहे. 12 ते 14 जुलै दरम्यान हा यात्रा महोत्सव पार पडणार आहे. त्यात ठिकठिकाणचे लाखो भाविक सहभागी होतील, हे लक्षात ठेवून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेची तयारी केली आहे. जिल्ह्यातील विविध आगारांतील 47 बसेस या तीन दिवसांत सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची धापेवाडा दर्शनाची सोय करणार आहे.

पंढरपूरची आषाढी एकादशीची महापूजा अन् यात्रा संपल्यानंतर साक्षात विठ्ठल धापेवाडा येथे आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी येतो, अशी आख्यायिकच नव्हे, तर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. त्याचमुळे धापेवाड्याला विदर्भाचे पंढरपूर म्हटले जाते. आषाढी एकादशीच्या तिसऱ्या दिवशी धापेवाड्यात मोठी दर्शनजत्रा भरते. ती पुढे दोन दिवस चालते. जत्रेला विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे, तर विविध प्रांतातील भाविक गर्दी करताता. यंदा ही जत्रा 12 ते 14 जुलै दरम्यान भरणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ठिकठिकाणच्या भाविकांना धापेवाड्यात नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था केली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील पाच आगारांतील एकूण 47 बसेस 12 ते 14 जुलै दरम्यान यात्रा स्पेशल म्हणून सज्ज करण्यात आल्या आहेत.

आगारनिहाय बस व्यवस्था

घाटरोड 15
काटोल 1
सावनेर 8
इमामवाडा 13
वर्धमाननगर 10
एकूण 47 बसेस

बसफेऱ्यांचे मार्ग

  •  घाटरोड आगारातून निघणाऱ्या बसेस नागपूर, कळमेश्वर मार्गे प्रवासी घेत धापेवाड्याला जातील.
  •  काटोलमधील बस काटोलसह मोहपा येथून धापेवाड्याला फेऱ्या मारेल
  •  सावनेर आगाराच्या बसेस सावनेर धापेवाडा अशा फेऱ्या करतील.
  •  इमामवाड्यातील बसेस, कळमेश्वर धापेवाडा फेऱ्या करतील
  •  वर्धमाननगर आगाराच्या बसेस नागपूर धापेवाडा मार्गावरील प्रवाशांना धापेवाडाची वारी घडवतील.

यात्रा स्पेशलसाठी एक निरीक्षक आणि चा4 नियंत्रक

एक वाहतूक निरीक्षक आणि चार वाहतूक नियंत्रक अशा पाच अधिकाऱ्यांवर यात्रा स्पेशल वाहतूक व्यवस्थेच्या नियोजन आणि नियंत्रणाची जबाबदारी राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 August 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्याहून पिवळं होणार, आजचे राशीभविष्य
Nashik Earthquake : नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के, भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल
नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, नाशिक शहर आणि विविध तालुक्यांमध्ये जाणवले धक्के
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget