एक्स्प्लोर

Walmik Karad Property: वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर

Walmik Karad Property: वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मासमत्ता असल्याचं समोर आलं आहे.

सोलापूर: बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी वाल्मिक कराडसह (Walmik Karad) त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बीडसह पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापुरात देखील वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मासमत्ता असल्याचं समोर आलं आहे. 

बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारे असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. या संदर्भात एबीपी माझाने अधिक माहिती घेतली असता ही तीच ज्योती मंगल जाधव आहे. जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे. 

एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे, त्याचबरोबर पुण्यातील एफसी रोड याठिकाणी ज्योती जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेस घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. 

कोणत्या ठिकाणी मालमत्ता?

1) पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला. 
2) पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
3) पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा आहे.
4) बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे. 
5) ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अॅमेनोरा पार्क टाऊनशीप मधे Sector R 21, Tower 33, floor 17, फ्लॅट 07 हा फ्लॅट Sector R 21 , Tower 33 , फ्लॅट 08 हा आणखी एक फ्लॅट Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Nagarparishad Election : शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार-सूत्र
Nana Patole Nagpur : भाजप ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदे, अजित पवारांना फटका बसणार
Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य, अमेरिकेचा संदर्भ
Embed widget