Solapur Polticial News : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातही वेगानं घडामोडी घडतायेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil) यांनी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते राजन पाटील (Rajan Patil) यांची भेट घेतली आहे. काल राजन पाटील यांच्या अनगर येथील 'मातोश्री' या निवासस्थानी मोहिते पाटलांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.  


विजयसिंह मोहिते पाटील अॅक्टीव्ह


विजयसिंह मोहिते पाटील हे अॅक्टीव्ह झाले आहेत. ते सध्या त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना  भेटू लागले आहेत. काल त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर येथे जावून माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. त्यामुळं राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण, राजन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. धैर्यशील मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचे चुलते विजयसिंह मोहिते पाटील हे राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. 


विजयदादांच्या भूमिकेनंतर राजन पाटील काय भूमिका घेणार? 


मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येत आहे. सध्या राजन पाटील हे महायुतीच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र, अशातच विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणाऱ्या राजन पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त आघाडी मोहोळ तालुक्यातून देण्याची जाहीर घोषणा केली होती. यानंतर विजयदादांनी राजन पाटील यांची भेट घेतल्याने नवीन चर्चेला तोंड फुटले आहे. मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर हे दोन्ही मतदारसंघ माहविकास आघाडीला जिंकून देण्याची घोषणा केल्याने विजयदादांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, राजन पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक असून सोलापूर लोकसभा युतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी त्यांनी प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. आता मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर राजन पाटील काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Madha : माढा लोकसभेत नवा ट्विस्ट, भाजपकडून उमेदवार आयात केला म्हणत शरद पवारांना भेटलेला नेता अपक्ष लढणार