एक्स्प्लोर

निवडणूक ही केवळ औपचारिकता, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं मिळणार नाहीत : जयकुमार गोरे

विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं त्यांना मिळणार नाहीत, असे वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

Jaykumar Gore : भाजपचे अनेक नेते कार्यकर्ते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत करुन सत्ता आणली आहे, त्यामुळं इच्छा असणे गैर नसल्याचे वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याने आमदार होण्याची संधी आहे. त्यामुळे अपेक्षा असणे साहजिक आहे. मोहिते पाटलांसंदर्भात बोलताना गोरे म्हणाले की, विरोधकांनी कितीही मोट बांधली तरी 100 पेक्षा अधिक मतं त्यांना मिळणार नाहीत. काल सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारी काढली काँग्रेसकडे केवळ 5 आणि एमआयएम कडे 9 मतदान आहे. त्यामुळे कितीही मोठी मोट बांधली तरी काही होणार नाही असे गोरे म्हणाले. . 

निवडणूक बिनविरोध करावी अशी अनेकांची भावना

माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की निवडणुका झाल्यात त्यावेळी काय परिस्थिती होती आपण पाहिले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी मी चर्चा करायला तयार असल्याचे गोरे म्हणाले. निवडणूक ही केवळ औपचारिकता राहिली आहे. जिल्ह्यात नवीन इतिहास करण्यासाठी निवडणूक बिनविरोध करावी अशी अनेकांची भावना आहे. 

पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही कमी नाही

पेट्रोल डिझेलचा साठा कुठेही कमी नाही. नागरिकांच्या मनात भिती तयार करण्यासाठी एक टोळी तयार झाली आहे. लोकांच्या मनात भिती निर्माण झाल्याने पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जात आहे. अधिकची खरेदी होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होतेय. मात्र प्रत्यक्षात कुठेही तुटवडा नाही असे गोरे म्हणाले. 

कॉकरोज जनता पार्टी संदर्भात मला माहिती नाही

कॉकरोज जनता पार्टी संदर्भात मला या संदर्भात अधिकची माहिती नाही. असे अनेक ट्रेंड समाजात होताना आपण बघतो. सध्या AI चा जमाना आहे त्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. त्यामुळे त्याला अधिकचं महत्त्व देण्याची गरज नाही. विरोधी पक्षाला अनेक क्लुप्त्या लढवताना आपण पाहिले आहे. विरोधकांना जनमाणसात स्थान नाही, प्रतिमा नाही, लोक आपल्या पाठीमागे येत नाहीत. त्यामुळे नवीन योजना आखून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. देशाचे नेतृत्व भक्कम आहे, एक मजबूत भारत आपण जगासमोर उभारला आहे. त्याप्रमाणे विकसित महाराष्ट्राचा स्वप्न घेऊन देवेंद्र फडणवीस काम करत आहेत असे गोरे म्हणाले. 

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत

जरांगे पाटील आंदोलनाबाबत विचारले असता गोरे म्हणाले की, या प्रश्नावर उत्तर देण्याची जबाबदारी प्रवक्त्यांची आहे. पण मी एवढे सांगेन की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. कुणबी दाखल्याचा प्रश्न मार्गी लागला. आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुणबी दाखल्यावर अनेकांनी निवडणूक लढवल्या. अनेक ठिकाणी नोकरीसाठी देखील दाखल्याचा वापर होतो. अण्णासाहेब पाटील महामंडळ सारथी या सर्वच संस्थांना सरकार मदत करतंय. लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र समाज व्यवस्था बाधित होईल अशा पद्धतीचा आंदोलन किंवा मत व्यक्त करणे चुकीचं होईल. समाजात समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. लढा लढण्याचा अधिकार सर्वांना आहे पण त्याचे परिणाम आपण सर्वांनी पाहिल्याचे गोरे म्हणाले.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Advertisement

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget