एक्स्प्लोर

Solapur News : बार्शीत आई-वडिलांसोबत आंदोलन करणाऱ्या दिव्यांग भावंडांचा मृत्यू, एकाच घरातील दोन्ही अपत्यांचा दुर्दैवी अंत

Solapur News : दिव्यांग निधीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात दुसऱ्या मुलाचा देखील मृत्यू बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात आंदोलनादरम्यान दिव्यांग मुलाचा मृत्यूमागील तीन महिन्यापूर्वी याच आंदोलनात दिव्यांग मुलीचा देखील झाला होता मृत्यू

Solapur News : दिव्यांग (Divyang) निधी मिळावा म्हणून तीन महिन्यांपूर्वी सोलापूरमधील (Solapur) बार्शीतल्या (Barshi) चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आई-वडिलांसोबत उपोषणाला बसलेल्या 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे रामचंद्र कुरुळे यांच्या 10 वर्षीय मुलाचा देखील या आंदोलनात मृत्यू झाला आहे. राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय (Divyang Mantralaya) स्थापन करण्याची घोषणा झाली असतानाच दोन दिव्यांग मुलांचा निधीसाठी आंदोलन करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दिव्यांग बांधावासाठी असलेला निधी मिळाला नाही म्हणून चिखर्डे येथील रामचंद्र कुरुळे आणि त्यांचे कुटुंबीय ऑगस्ट महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. निधी मिळावा म्हणून 18 ऑगस्टपासून गावातच उपोषण सुरु करण्यात आले होते. उपोषणाला गावातील दहा ते पंधरा लोक बसले होते. या आंदोलनात अल्पवयीन मुलगी वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. मात्र दिवसभर उन्हात बसल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. वैष्णवी हिच्या दुर्दैवी निधनानंतर संबंधितांवर कारवाई करु, तसेच निधी देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. त्यानंतर आंदोलन स्थगित करुन कुरुळे कुटुंबियांनी वैष्णवीच्या पार्थिववर अंत्यसंस्कार केले होते.

आंदोलनात आधी मुलीला गमावलं, आता मुलाचाही मृत्यू
मात्र तीन महिने उलटून देखील आश्वासनाची पूर्तता न झाल्याने कुरुळे कुटुंबीय पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली. गावातील स्मशानभूमीत कुरुळे कुटुंबीय उपोषणाला बसले होते. या उपोषणा दरम्यान रामचंद्र कुरुळे यांचा अवघ्या 10 वर्षाचा मुलगा संभव याचा देखील मृत्यू झाला. वैष्णवी आणि संभव या दोन्ही दिव्यांग भावंडांच्या मृत्युला प्रशासन जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तोपर्यंत संभववर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका कुरुळे कुटुंबियांनी घेतली होती.

प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांचा आत्मदहानाचा प्रयत्न
संभवच्या मृत्युला 18 तास उलटले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता चिखर्डेतील ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत. प्रहार अपंग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दिव्यांग बांधवांना जगण्याचा अधिकार नाही का असा सवाल संजीवनी बारंगुळे यांनी विचारला. तर जोपर्यंत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

संबंधित बातम्या

अपंग निधीसाठी आंदोलनाला बसलेल्या दिव्यांग मुलीचा उपोषणादरम्यान मृत्यू; ग्रामस्थांचा आरोप, प्रशासन म्हणाले...

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget