एक्स्प्लोर

Solapur : मनोज जरांगे यांचे आंदोलन फक्त मराठवाड्यासाठी, त्याचा फायदा इतर भागातील मराठ्यांना नाही; सोलापूर मराठा आक्रोश मोर्चाची भूमिका 

Maratha Reservation : हैदराबाद संस्थानमधील मराठा बांधवांची नोंद ही कुणबी म्हणून होती, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 

जालना : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पुन्हा एकदा पेटला असल्याचं चित्र असून जालन्यात मनोज जरांगे यांनी त्यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. पण आता वेगवेगळ्या मराठा संघटनांकडूनही मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध होताना दिसतोय. सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्च्यातील समन्वयकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. त्यामुळे या वादाला आता मराठा विरुद्ध कुणबी असं स्वरुप मिळतंय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषणाच्या दरम्यान मराठवाड्यातील मराठ्यांचं काय असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला. तसेच इतर ठिकाणच्या मराठा समाजाला अनेक सोईसुविधा मिळत असताना मराठवाड्यातील मराठा मात्र त्यापासून वंचित असल्याचं वक्तव्यही केलं. नेमका त्यावर आता आक्षेप घेतला जात असून पहिली प्रतिक्रिया सोलापुरातून आली आहे. 

मनोज जरांगे यांचे सुरु असलेले उपोषण हे केवळ एका प्रांतापुरते मर्यादित असून त्याचा फायदा राज्यातील इतर भागातल्या मराठा समाज बांधवाना होणार नाही असं सोलापूर मराठा आक्रोश मोर्च्याच्या समन्वयकांनी सांगितलं. सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार आणि अनंत जाधव म्हणाले की, "हैद्राबाद संस्थानच्या मराठवाड्यातील मराठा समाज बांधवची नोंद ही कुणबी अशी होती. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यांच्या य मागणीने केवळ मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाला फायदा होईल. इतरांनी का म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.

राजेंद्र कोंढरे यांच्यासारख्यांकडे कुणबी मराठा प्रमाणपत्र आहे. ते कुणबी म्हणून ओबीसीतून मिळणारे लाभ देखील घेतात. तसेच मराठा समाजासाठी असलेल्या सारथी आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळचा देखील लाभ घेतात असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या ताटातील काहीही आम्हाला देत नाही. मात्र आमच्या ताटातील घेतात असं ते म्हणाले.

सोलापुरातील मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार आणि अनंत जाधव म्हणाले की, "शासनाने हैद्राबादला कमिटी पाठवली आहे, मराठा समजाला आतां लक्षात येईल की आपण ज्या आंदोलनाला पाठिंबा देतोय त्याचा फायदा केवळ मराठवाड्यातील लोकांना होईल, आपल्याला नाही. मनोज जरांगे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडावा, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. ते जर केवळ मराठवाड्यापुरते बोलणार असतील तर आमचा त्यांना पाठिंबा नसेल. 

ही बातमी वाचा: 

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget