सोलापूर : मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारून टाकेन अशी धमकी दिल्याने या त्रासाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणी सुरज सुभाष नकाते (वय 29),तोसिफ चाँदसाो मुजावर (वय 24), शुभम मोहन नकाते (वय 24) या तीघांना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी तसेच मृत महिलेचा पती कुटुंबासह हे पुणे येथे राहण्यास होते. हे कुटुंब 28 जुलै 2024 रोजी त्यांच्या मूळ गावी आले होते. यातील आरोपी हा नातेवाईक असल्याने तो नेहमी पुणे येथे घरी फिर्यादी घरी नसताना ये जा करीत असे. तो नातेवाईक असल्याने मृत पत्नीच्या पतीला कुठलाही संशय आला नव्हता. तर तिघे आरोपींचे हे खास मित्र आहेत. ही महिला 21 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून गेली होती.
तलावात उडी मारून विवाहितेची आत्महत्या
मात्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका गृहस्थाने महिलेच्या पतीस फोन करून तुमची पत्नी ही तलावात बुडून मृत्यू झाला आहे असे सांगितले. हे कळताच फिर्यादी हे तात्काळ घटनास्थळी पळत गेल्यावर त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसून आली.लोकांनी मृत महिलेस बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे सांगितले.
आरोपींना पोलीस कोठडी
मृत महिलेच्या मोबाईलची हिस्ट्री तपासली असता वरील तीघे आरोपी सातत्याने मयतास अनैतिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करत असल्याचे आढळून आले. तसेच शारिरीक त्रास देत असल्याने त्या त्रासास कंटाळून तलावात उडी मारून आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान निरीक्षक महेश ढवाण यांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवून तीघा आरोपींना तात्काळ गजाआड केले आहे. अंमलदार पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांनी तीघा आरोपींना अटक करून न्यायालयात उभे केले असता सुरज नकाते याला तीन दिवस,तोसिफ मुजावर यास दोन दिवस व शुभम नकाते याला चार दिवस पोलिस कोठडी मिळाली असल्याचे अंमलदार यांनी सांगितले.
हे ही वाचा :