एक्स्प्लोर

राम सातपुतेंच्या हत्येचा कट? उत्तम जानकरांचा पलटवार, म्हणाले, मुर्दाड माणसाला कोण मारणार? प्रसंगही सांगितला

माझ्या हत्येच्या कटाबाबत पोलीस खाते आणि गुप्तचार विभाग चौकशी करत आहे. एसपी, आयजी आणि राज्याचं गुप्तहेर खात हे सर्व मिळून तपास करत आहेत

सोलापूर : भाजप नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar gore) यांनी जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केलेल्या आरोपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. माळशिरसचे माजी आमदार आणि भाजप नेते राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे धक्कादायक वक्तव्य जयुकमार गोरे यांनी केले होते. त्यास, राम सातपुते (Ram satpute) यांनीही दुजोरा दिला असून माझ्या हत्येच्या कटाबाबत पोलीस खाते आणि गुप्तचार विभाग चौकशी करत आहे, असे त्यांनी म्हटलंय. त्यांना काही तरी गोष्टी निदर्शनास आल्या असून त्याचबरोबर गुप्त माहिती देखील मिळाल्याचं राम सातपुते यांनी म्हटलं. आता, या आरोपावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर (Uttam jankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

माझ्या हत्येच्या कटाबाबत पोलीस खाते आणि गुप्तचार विभाग चौकशी करत आहे. एसपी, आयजी आणि राज्याचं गुप्तहेर खात हे सर्व मिळून तपास करत आहेत, तपासात सत्य समोर येईल. मी याबाबत स्पष्ट बोलणार नाही, ज्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येतय ते सर्व मिळून काही कट करत असल्याचं पुढं येत आहे. माळशिरस तालुक्यातील लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यातल्या एकेकाला बोलवून तपास सुरू आहे. मोहिते-पाटील यांच्या संदर्भातील काही लोक अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात, असे राम सातपुते यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले. आता, यावर उत्तम जानकर यांनी पलटवार केला आहे. 

मुर्दाड माणसाला कोण मारणार? पालकमंत्री महोदयांनी म्हटलं असेल पण निवडणुकीत फक्त धराधरी, पकडापकडी झाली. फार मोठा काही विषय नव्हता. निवडणुकीत अशा गोष्टी होतात, कार्यकर्ते उत्साहाच्या भरात असतात, फार काही महत्वाचं नव्हतं. हत्येचा कट रचण्याच्या आरोपाबाबत पालकमंत्री यांनाच जास्त माहिती असेल, ते माहिती देतील. पण, माजी आमदाराच्या हत्येचा कट कोण रचेल? असा सवाल उत्तम जानकर यांनी उपस्थित केला. राम सातपुतेनीच आगावपणा केला, गुलालाची पिस्तूल बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. बाबा माने पराभूत झाले आणि रागात एकमेकाची धराधरी झाली, अशा घटना अनेक ठिकाणी होतात. मुर्दाडाला कोण मारणार? आणि कशासाठी मारायच?,  असेही उत्तम जानकर यांनी म्हटले. 

आम्ही मैदानात लढणारी माणसं

राम सातपुते यांच्या अंगावर गेलेल्या लोकांना भीती घालण्यासाठी पालकमंत्री बोलले असतील, याची दखल कराचीच्या NIA ने घेतली का? आम्ही मैदानात लढणारी माणसे आहोत, असं चोरीछुपं काही करतं नाही. तो राजकीय विरोधक आहे आणि राम सातपुतेसाठी काही करावं हे मला पटत नाही, अशा शब्दात उत्तम जानकर यांनी राम सातपुतेंच्या हत्येच्या कटावरील आरोपावर प्रत्युत्तर दिले. 

निवडणूक आयोगावर टीका

अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी मुलाला सोबत नेऊन मतदान केल्यासंदर्भात त्यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, निवडणूक आयोग एवढं कधी जागृत झालं. अनगरमधील एका गावात 96 टक्के मतदान होतं, तिथं निवडणूक आयोग झोपलेला आहे काय? लहान मुलाने हट्ट केला म्हणून मतदान केंद्रावर नेलं असेल, अशी प्रतिक्रिया उत्तम जानकर यांनी दिली. 

हेही वाचा

भाजपच्या नगरसेवकांनी 'मोदी-मोदी' घोषणेने सभागृह डोक्यावर घेतलं, इकडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी 'चोर है' घोषणा दिल्या, मग भाजपने ट्रम्प कार्डच बाहेर काढलं

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही, प्रशांत जगताप दंड थोपटत म्हणाले....
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Embed widget