एक्स्प्लोर

BMC Mayor Election BJP Vs Thackeray: भाजपच्या नगरसेवकांनी 'मोदी-मोदी' घोषणेने सभागृह डोक्यावर घेतलं, इकडून ठाकरेंच्या नगरसेवकांनी 'चोर है' घोषणा दिल्या, मग भाजपने ट्रम्प कार्डच बाहेर काढलं

BMC Mayor Election BJP Vs Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात ठाकरे गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने. देवेंद्र फडणवीसांच्या समोर जोरदार घोषणाबाजी.

BMC Mayor Election BJP Vs Thackeray: मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर बुधवारी भाजपचा महापौर विराजमान झाला. भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawde) यांची बुधवारी अधिकृतरित्या महापौर म्हणून निवड झाली. त्यामुळे आज मुंबई महानगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आली. मात्र, सत्तारोहणाच्या या पहिल्याच दिवशी भाजप (BJP) आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत (Mumbai Mahangarpalika Election 2026) आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता.

यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देऊन पालिका सभागृह डोक्यावर घेतले. भाजपच्या नगरसेवकांकडून मोदी-मोदीचा जयघोष थांबतच नव्हता. तेव्हा समोर उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपच्या 'मोदी-मोदी' पाठोपाठ अचानक 'चोर है, चोर है', अशा घोषणा सुरु केल्या. ठाकरे गटाच्या या अनपेक्षित पवित्र्यामुळे भाजप नगरसेवकांनी 'मोदी-मोदी'च्या घोषणा थांबवल्या. मात्र, लगेचच भाजपच्या नगरसेवकांनी 'देवाभाऊ-देवाभाऊ' नावाचा गजर सुरु केला. त्यावर कोणीही 'चोर है, चोर है' घोषणा देण्याची हिंमत दाखवली नाही. मात्र, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनीही 'ठाकरे-ठाकरे' नावाचा जयघोष सुरु केला. या घोषणांमुळे पालिकेचे सभागृह दणाणून गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम सभागृहाच्या गॅलरीत बसून हा प्रकार शांतपणे पाहत होते. पहिल्याच दिवशी ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आल्याने आगामी काळातही या दोन पक्षांमध्ये अशाचप्रकारची खडाजंगी होण्याची चिन्हं दिसत आहेत.

आता थोड्याचवेळात भाजपच्या रितू तावडे या महापौर आणि शिवसेनेचे संजय घाडी हे उपमहापौर म्हणून शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील यावेळी सभागृहात उपस्थित होते. 

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांकडून महापौर रितू तावडेंचं कौतुक

महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी असे महायुतीचे दोन शिलेदार विराजमान झाले आहे. मुंबई महानगरपालिकेला लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबाबत आम्ही लोकांना मतं मागितली होती. मुंबईच्या जनतेने जो प्रतिसाद दिला होता, त्याला अनुरूप आज पदारोहण होत आहे. मी रितू तावडे यांचं अभिनंदन करतो. एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी मागच्या काळातही मुंबईकरांच्या प्रश्नाकरता आक्रमक भूमिका घेतली आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम महायुतीच्या सरकारने सुरु केला आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून योग्यप्रकारे राबवला जाईल. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1

आणखी वाचा

मुंबई महानगरपालिकेत प्रशासक राजवटीत महत्त्वाचा नियम बदलण्याच्या हालचाली; नगरसेवक, स्थायी समितीच्या अधिकारांवर गदा?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Jal Jeevan Mission: पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
पंतप्रधानांच्या 'जलजीवन मिशन'चा वर्ध्यात बोजवारा; दीड वर्षांपासून नळ कोरडे, योजनेचे लाखो रुपये पाण्यात!
Donald Trump on Mojtaba Khamenei: इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा मृत्यू? डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा; म्हणाले...
Embed widget