सोलापूर : सोलापुरात (Solapur News) एका ठगाने जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन चालक असल्याची बतावणी करत सोनाराला गंडा घातला आहे. तब्बल 8 सोन्याच्या अंगठ्या आणि तीन लॉकेट घेऊन हा चोर पसार झाला. यांसदर्भात सोनार अयाज मुल्ला यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यत फिर्याद दिली आहे.
17 ऑगस्ट गुरुवार रोजी आज मुल्ला यांच्या विजापूर नाका परिसरात असलेल्या निहाल ज्वेलर्स या दुकानात एक व्यक्ती आला. आपण जिल्हाधिकारी कार्यालयात वाहन चालक आहोत. जिल्हाधिकारी हे बैठकीला आलेल्यांना सोन्याची अंगठी आणि लॉकेट भेट देणार आहेत, अशी बतावणी केली. सुरुवातीला या चोरट्याने सोनार दुकानातील एका व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात सोबत नेले. जिल्हाधिकारीएका बैठकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील व्यक्तीने मुल्ला यांना थोडा वेळ बसण्यास सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी वेळ लागत असल्याचे सांगितले. मुल्ला यांचा आरोपीवर विश्वास बसला. आरोपीने दुकानात जाऊन सोने खरेदी करून जिल्हाधिकाऱ्यांना दाखवू असे म्हणत परत दुकानात आले. त्यानंतर पुन्हा दुकानात येऊन आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट असा जवळपास साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल खरेदी केला.
आठ अंगठ्या आणि लॉकेटसह साडेचार लाख रुपयांचा माल चोरीला
आठ अंगठ्या आणि तीन लॉकेट खरेदी केल्यानंतर बील जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यावर देतो असे देखील सांगितले. त्यानंतर सोनार आणि आरोपी हे दोघेही आठ अंगठ्या आणि लॉकेटसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. येथे आल्यानंतर आरोपीने सोनारास प्रतीक्षा कक्षात बसवले. अंगठीचे सॅम्पल दाखवून येतो असे सांगून आरोपी तिथून निघून गेला. बराच वेळ झाल्यानंतर ही आरोपी न आल्याने सोनाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.
सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू
जिल्हाधिकारी कार्यालयात हा प्रकर घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर पोलिस या प्रकरणाचा अधिका तपास करत आहे. सीसीटीव्हीवरून संशयिताचा शोध घेत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आरोपी बाहेर पडल्यानंतर ज्या रिक्षातून गेला त्या रिक्षा चालकाची देखील चौकशी केली, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्याने बनावट नावाचा वापर करून फसवणूक केले आहे. आरोपी हा पोलीसांच्या रेकॉर्डवर नसून त्याला शोधण्यासाठी पोलीसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध सुरू आहे
हे ही वाचा :