Pandharpur News : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti), शनिवार (Saturday) आणि रविवार (Sunday) अशा सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात (Pandharpur) पुन्हा एकदा हजारो पर्यटकांनी (Tourist) गर्दी केली असून पंढरपूर पुन्हा ओव्हर पॅक झाले आहे. गेल्या आठवड्यातही सलग सुट्ट्या आल्याने अशाच पद्धतीने गर्दी झाली असताना पुन्हा या आठवड्यातही हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी तुफानी गर्दी केली आहे. 


अवकाळी पावसाचा अंदाज देऊनही भाविक पंढरपुरात


विशेष म्हणजे हवामान खात्याने पाच दिवस पावसाचा अंदाज दिला होता. अगदी काल (14 एप्रिल) रात्रीही पंढरपूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस देखील झाला आहे. असे असतानाही पर्यटकांनी हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा धार्मिक पर्यटनाला प्राधान्य दिल्यानेच यात्रेसारखी गर्दी झाली आहे. यामुळे शहरातील सर्व हॉटेल, लॉजेस, धर्मशाळेत पाय ठेवायला जागा नाही. पर्यटकांच्या शेकडोच्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे सर्व पार्किंग फुल झाल्याने रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यात येत आहेत. 


दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे


विठुरायाच्या दर्शनाची रांग थेट चंद्रभागा घाटावरील सारडा भवनच्या पुढे गेल्याने भाविकांना दर्शनासाठी तासनतास दर्शन रांगेत थांबावे लागत आहेत. या हजारो पर्यटकांच्या गर्दीमुळे व्यापारी वर्ग मात्र खुश असून चैत्री यात्रा फेल गेली तरी या महिन्यात सलग सुट्ट्यांमुळे व्यावसायिकाने चांगला व्यवसाय करता आला आहे. 


सलगच्या सुट्ट्यांमुळे मागच्या आठवड्यातही पंढरपुरात यात्रेचं स्वरुप


मागील आठवड्यातही पंढरपुरात अशीच गर्दी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी गुड फायडे (7 एप्रिल), शनिवार (8 एप्रिल) आणि रविवार (9 एप्रिल) असा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे तीन दिवस शहराला यात्रेचे स्वरुप आले होते. सलग तीन दिवस लागूनआलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी देशभरातील पर्यटक आणि भाविकांची तोबा गर्दी केली होती. 


चार लाख भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता चैत्री यात्रा सोहळा


मराठी महिन्यातील पहिली यात्रा म्हणजे चैत्री अर्थात कामदा एकादशीचा सोहळा चार लाखांपेक्षा जास्त भाविकांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच संपन्न झाला होता. शिखर शिंगणापूर इथे मोठा देव अर्थात महादेवाचा विवाह सोहळा होत असल्याने वारकरी संप्रदायात हरी हरा नाही भेद ची शिकावं देणारी हि यात्रा मानली जाते. कामदा एकादशीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी पंढरपुरात आले होते.


हेही वाचा


Ashadhi Wari 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा; 11 जूनला होणार प्रस्थान