Solapur News : सोलापूरच्या (Solapur) अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील वीरशैव समाजाच्या बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी (Shrikanth Shivacharya Mahaswami) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून 28 लाख रुपये उकळल्याचा आरोप श्रीकंठ शिवाचार्य यांच्यावर आहे. शांतवीरप्पा कळसगोंड या तरुणाने अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नोकरीचं आमिष दाखवून तरुणाची 28 लाख रुपयांना फसवणूक


महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य हे अक्कलकोट (Akkalkot) तालुक्यातील नागणसूरमधील एका शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. एका तरुणाला शाळेत शिक्षकाची (Teacher) नोकरी लावतो म्हणून त्यांनी 28 लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आपल्या शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असून एका महिन्यात 28 लाख रुपये दिल्यास शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आश्वासन श्रीकंठ शिवाचार्य यांनी वर्षभरापूर्वी तरुणाला होतं. नोकरी (Job) मिळवण्यासाठी या तरुणाने आपली पाच एकर जमीन विकून 28 लाख रुपये जमा केले. ही रक्कम तरुणाने श्रीकंठ शिवाचार्य यांना दिले. परंतु 28 लाख रुपये देऊन बरेच महिने उलटून गेले, नोकरी मात्र मिळाली नाही. त्यामुळे या तरुणाने याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली. परंतु त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसंच पैसे परत मागितल्यानंर दमदाटी करण्यात आली. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तरुणाच्या लक्षात आलं.


श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा


यानंतर फसवणूक झालेला तरुण शांतवीरप्पा कळसगोंड याने दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरोधात भादंवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी अनेक तरुणांना नोकरी लावतो म्हणून अशीच फसवणूक केल्याचं समजतं.


2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते श्रीकंठ शिवाचार्य


दरम्यान नागणसूर येथील बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांना लिंगायत समाजासह संपूर्ण वीरशैव समाजात मोठा मान आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत ते भाजपकडून सोलापुरातील उमेदवार म्हणून इच्छूक होते. त्यावेळी भाजपने गौडगावचे मठाधिपती डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींना उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता.


हेही वाचा


काशीपीठाच्या ज्ञानसिंहासनावर उत्तराधिकारी अन् 87 वे जगद्गुरू म्हणून सोलापूरचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी