Maratha Kranti Thok Morcha On Manoj Jarange: मनोज जरांगेंनी मराठा समाजाची फसवणूक केली; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप, नेमकं काय घडलं?
Maratha Kranti Thok Morcha On Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील आंदोलन करून मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Maratha Kranti Thok Morcha On Manoj Jarange: मराठा आंदोलनात (Maratha Reservation) आता उभी फूट पडली असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंदोलन करून मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या (Maratha Kranti Thok Morcha) कार्यकर्त्यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील करत असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नसून 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यभर आंदोलन उभारणार, असंही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक सुनील नागणे यांनी सांगितले.
2014 साली पृथ्वीराज चव्हाण, त्यानंतर देवेंद्र फडणवीस व आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या कोपराला गुळ लावण्याचं काम करत आहेत. 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, या मागणीसाठी पुढील काळात जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेत आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे जाहीर केले आहे.
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस- (Manoj Jarange Protest)
मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी न झाल्यानं जरांगेंचं उपोषण अजूनही सुरुच आहे. मात्र शिष्टमंडळाच्या आवाहनानंतर जरांगे पाणी पिण्यासाठी आणि सलाईन घेण्यासही राजी झाले...मात्र सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा निर्धार जरांगेंनी केलाय..दरम्यान जरांगेंच्या मागण्यांवर एक ते २ दिवसात निर्णय कळवू अशी भूमिका शिष्टमंडळानं जाहीर केलीय...तर जरांगे १२ तारखेला मुंबईला येण्यावर ठाम आहेत.
11 तारखेपर्यंत सगळ्या मान्य करा- मनोज जरांगे (Manoj Jarange Patil Protest)
11 तारखेपर्यंत सगळ्या मान्य करा असं नवं अल्टिमेटम मनोज जरांगेंनी सरकारला दिलं आहे.11 तारखेला मागण्या मान्य झाल्यास मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि 12 तारखेच्या बैठकीत पुढचा निर्णय घेऊ असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले. मंत्र्यांच्या शब्दाला मान देतो, एकाच्या ठिकाणी दोन सलाईन लावून घेतो, मात्र सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.






















