Solapur News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेतल्या जाणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग आणि न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत सोलापूरचा सुबोध भैसारे हा राज्यात पहिला आला आहे. सुबोध याने 200 पैकी तब्बल 178 गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकवालं आहे. सुबोधचे वडील अशोक भैसारे देखील न्यायाधीश राहिले आहेत. त्यामुळे त्यांची दुसरी पिढी न्यायिक क्षेत्रात येणार आहे. वयाच्या 27 व्या वर्षी सुबोधने यशाला गवसणी घातली आहे. मागील वर्षी देखील सुबोधने JMFC परीक्षा दिली होती. मात्र त्यात यश आले नाही. मात्र या अपयशने खचून न जाता सुबोधने परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. यंदा मात्र राज्यात पहिला क्रमांक मिळवला. सुबोधच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अपयशानंतर यशाला गवसणी
सुबोधचे माध्यमिक शिक्षण हे सोलापुरात झाले आहे. पुण्यातल्या आयएसएस महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या 27 व्या वर्षी सुबोधने यशाला गवसणी घातली आहे. मागील वर्षी देखील सुबोधने JMFC परीक्षा दिली होती. मात्र मुख्य परीक्षेत त्याला यश आलं नाही. मात्र या अपयशाने खचून न जाता सुबोधने परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. यंदा मात्र राज्यात पहिला क्रमांक मिळवलाय आहे. "मी शालेय जीवनापासून नेहमीच प्रत्येक परीक्षेत टॉपर राहिलो आहे. त्यामुळे मला अपयश कधी आलेले नव्हते. मात्र JMFC च्या पहिल्या प्रयत्नात अपयश आल्याने मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी अधिकच नम्र झालो. अपयश आल्यानंतर मी माझ्या पेपर कॉपी मागवल्या. त्यात नेमक्या कुठे चुका झाल्यात हे तपासले. त्या चुकांवर काम केल्याने यंदा यश प्राप्त झाले," अशी प्रतिक्रिया सुबोध भैसारेने दिली.
मुलगा न्यायाधीश झाल्यानंतर वडिलांना आनंदाश्रू अनावर
सुबोध याचे वडील अशोक भैसारे हे मूळचे गोंदिया जिल्ह्याचे आहेत. ते स्वत: देखील न्यायाधीश राहिले आहेत. धुळे, चंद्रपूर, नागपूर, पुणे, ठाणे आणि सोलापूर या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवा बजावली आहे. ते सध्या सोलापूरच्या ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष आहेत. अतिशय संघर्षातून ते स्वतः न्यायाधीश झाले. आता त्यांची दुसरी पिढी न्यायिक क्षेत्रात येणार आहे. विशेष म्हणजे सुबोध भैसारे याचा मोठा भाऊ शुभम भैसारे हे देखील मागील वर्षी IAS परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि आता सुबोध न्यायाधीश झाला आहे. त्यामुळे भैसारे कुटुंबियांच्या आंनदाला पारावार उरला नाही. हा आनंद व्यक्त करताना सुबोध भैसारे यांच्या वडिलांना आनंदश्रु अनावर झाले. "दोन्ही मुलांच्या यशाने मला प्रचंड आनंद झाला आहे. हे यश म्हणजे त्यांचेच कर्तृत्व आहे. आई-वडील म्हणून जे आमचे काम आहे आम्ही ते केलं. त्यांनी स्वतःच करिअर निवडलं आहे. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलं. त्यामुळे त्यांना यश मिळाले," अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती अशोक भैसारे यांनी दिली.