Beed News : ऊसतोडणीच्या (Sugarcane Cutting) कामासाठी मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) बीडमध्ये (Beed)  आणलेल्या तीन अल्पवयीन मुलांची (Minor Children) पोलिसांनी सुटका केली असून, त्यांना बालकल्याण समितीच्या (Child Welfare Committee) ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन मुलांकडून जबरदस्तीने ऊस तोडण्याचं काम करुन घेतलं जात होते. दरम्यान गावातील नागरिकांना याबाबत कळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तीनही मुलांची सुटका केली असून, त्यांना सध्या बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. मात्र अजूनही मुकादमावर कोणतीही कारवाई झालेली नाही. 


याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या अनेक ठिकाणी ऊसतोडणीचे काम सुरु असून, याच कामासाठी मध्य प्रदेशातील तीन अल्पवयीन मुलांना महाराष्ट्रात आणले गेले. तर त्यांच्याकडून ऊसतोडीचे अवघड काम करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगाव येथे समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील हे तिन्ही मुलं असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुलांची सुटका केली असून, मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे. तर याबाबत जिल्हा बालकल्याण समितीने दिंदूड ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला पत्र पाठवून गुन्हा नोंदवण्याची शिफारस देखील केली आहे. सध्या या तीनही अल्पवयीन मुलांना बालकल्याण समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


पोलिसांनी केली सुटका!


शिक्षण घेण्याच्या वयात तीन अल्पवयीन मुलं ऊसतोडीसाठी जात असल्याचे सिमरी पारगाव येथील नागरिकाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांना दिली. माहिती मिळताच कांबळे यांनी याबाबत पोलिसांना कळवले. कांबळे यांच्याकडून माहिती कळताच दिंदूड ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक प्रज्ञा पुंडगे, सहायक उपनिरीक्षक एस. बी. पवार हे सिमरी पारगाव पोहचले. तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे तिन्ही मुलांचा शोध सुरु केला. दरम्यान यावेळी ही तिन्ही अल्पवयीन मुलं एका ऊसाच्या फडात आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची तेथून सुटका केली. 


पैशाचे आणि मोबाईलचे आमिष दाखवून आणले!


तिन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही मुले एका ऊसतोड मजुराकडे आश्रयाला असल्याचं समोर आले. दरम्यान मुलांच्या पालकांना कळू न देता त्यांना पैशाचे आणि मोबाईलचे आमिष दाखवून मध्य प्रदेशातीलच एका मुकादमाने जीपमधून महिन्यापूर्वी त्यांना दिंदूड परिसरात आणले. दिंदूड परिसरात आणल्यावर त्याने या मुलांना येथील एका मुकादमाच्या स्वाधीन केले. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तर मुलांच्या पालकांशी बालकल्याण समितीने संपर्क साधला असून, त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची माहितीही मागवली आहे. मात्र या मुकादमावर अजूनही कारवाई झाली नसून, कारवाई करण्याची मागणी बालकल्याण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News: बीड जिल्ह्याला हादरवणाऱ्या जोगदंड हत्याकांड प्रकरणी सहा पैकी पाच आरोपींची निर्दोष मुक्तता