कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, शिवराळ भाषेतील टीकेनंतर जयकुमारे गोरेंचा राऊतांना टोला
Jaykumar Gore on Sanjay Raut : कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
Jaykumar Gore on Sanjay Raut : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलेलं नाही, ते पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील, असा खोचक टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लगावला होता. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टीका केली होती. त्यांनी जयकुमार गोरेंबाबत शिवराळ भाषेचा वापर केला होता. यानंतर भाजपचे कार्यकर्ते संजय राऊतांविरोधात आक्रमक झाले आहेत. या घटनेवर मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही असा टोला गोरेंनी लगावला.
संजय राऊतांनी पालकमंत्री जयकुमार गोरे विरोधात टीका केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक
खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे विरोधात टीका केल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनगर गावात संजय राऊत यांचा पुतळा दहन करत निषेध व्यक्त केला आहे. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्यराणा पाटील यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. पालकमंत्री गोरे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करताना संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला होता.
विधानपरिषद निवडणुकीत सर्वानी सहकार्य केलं त्यामुळे राजेंद्र राऊत बहुमताने निवडून आले
सोलापूरच्या जनतेने सर्व निवडणुकीत भाजपला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो असेही गोरे म्हणाले. विधानपरिषद मिवडणुकीतही तिकीट राजाभाऊ राऊत यांना मिळालं तेव्हाही तुम्ही प्रेम दिलं आहे. व्यासपीठवर सर्व मोठे नेते आहेत, एका म्यानात एक तलवार बसत नाही पण आम्ही एका म्यानात दहा-दहा तलवारी बसवल्याचे गोरेम्हणाले. सर्वांचा सन्मान राखता सर्वांना स्पेस दिली. विधानपरिषद निवडणुकीत सर्वानी सहकार्य केलं त्यामुळे राजेंद्र राऊत बहुमताने निवडून आल्याचे गोरे म्हणाले.
सोलापूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक राजन मालक तुमच्याच नेतृत्वात होईल
आपल्या जिल्ह्यावर आपल्या मातीवर प्रचंड प्रेम असलेला नेता म्हणजे राजेंद्र राऊत आहेत असे म्हणाले. राजेंद्र राऊत हे आमच्या पक्षातले बाजीप्रभू आहेत, ज्यावेळी गरज येते त्यावेळी सर्वात पुढे असणारा हा नेता आहे. कुठलीही निवडणूक ही जयकुमार गोरेच्या नेतृत्वात होणार नाही. जिल्ह्यातील नेते हेचं या निवडणुकांचे नेतृत्व करतील असेही गोरे म्हणाले. आजही सांगतो सोलापूर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक राजन मालक तुमच्याच नेतृत्वात होईल.ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी मी तुमच्यासोबत असेन असे मत गोरे यांनी व्यक्त केले.
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय























