सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुक्यात 11 हजार एकरावरील द्राक्ष बागांना (Grapes Farming) अवकाळीचा फटका बसला असून, सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागांना दणका बसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आज पहाटे पंढरपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाला. या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंब बागांना मोठा फटाका बसला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे मागील तीन वर्षांपासून पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सतत संकटात सापडत असून, त्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात 23 मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर पटवर्धन कुरोली येथे 20 आणि चले भागात 17 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडात पाणी गेल्याने फळ गळतीचा धोका वाढला आहे. शिवाय भुरी, दावण्या या रोगांचा ही प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पाऊस पडल्याने आज सकाळपासूनच शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पंढरपूर तालुक्यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. पण, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
सलग तिसऱ्या वर्षी द्राक्ष बागांना दणका...
मागील तीन वर्षांपासून सतत अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान, याचाच फटका द्राक्ष बागांना देखील बसतांना पाहायला मिळत आहे. पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे पिक घेतले जाते. तालुक्यात तब्बल 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षाचे पिक घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
नांदेडमध्ये शेतात पाणी साचले...
नांदेड जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीने शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे साचलेले पाणी शेतातून बाहेर काढण्यासाठी मोटर लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सोबतच अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांन देखील बसला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: