Solapur Rain : सोलापूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यात वाहून गेल्याने एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. सोलापुरातल्या जोडभावी पेठ परिसरातील धक्कादायक घटना घडली. सलाम दलाल असे 35 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुसळधार पावसात घरी परत येत असताना कुंभार वेस परिसरातील नाल्याजवळ गाडी घसरल्याने मृत तरुण कोसळला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने प्रवाहासोबत तो वाहून गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालंय.
मृत सलाम दलाल याला एकूण 3 मुलं असून अवघ्या 3 महिन्याचा बाळ आहे तर 5 आणि 3 वर्षाचे दोन मुलं ही अनाथ झाली आहेत. मुंबईत झालेल्या 26/11 च्या वेळेस वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने जखमी झाले होते, काही महिन्यापूर्वी त्यांचा ही मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील कर्ता असलेल्या सलाम याचा ही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातं आहे.
सलाम दलाल हा माझा नातेवाईक होता. 26 11 च्या हल्ल्यात त्याचे वडील साबीर दलाल यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेला दोनच दिवसांपूर्वी 14 वर्षे पूर्ण झाले. त्यानंतर आता ही अशी दुर्दैवी घटना घडली आहे. सलाम यांना तीन लहान चिमुकले मुलं आहेत. या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शासनाने या कुटुंबाला योग्य तो न्याय द्यावा, अशी प्रतिक्रिया हाजी इम्तियाज दलाल यांनी दिली. ते मृत सलाम यांचे नातेवाईक आहेत.
सोलापुरात काल संध्याकाळी सात वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री 11 नंतर या पावसाने रौद्ररूप धारण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहेत. शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजला आहे. आधीच कांद्याची आवक वाढल्याने घसरलेले भाव कांदा पावसात भिजल्याने पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पळून झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे.
सोलापुरात पावसाचा धुमाकूळ -दोन दिवसांपासून राज्यभरात अवकाळी पावसाने हाहा:कार माजवलाय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरात अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे ज्वारी, हरभरा,गहू,कांदा,तूर, मका पिकांचे मोठं नुकसान झालं. वादळी वारा आणि पावसामुळे पिके आडवी झाली. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरापाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली.