एक्स्प्लोर

Pandharpur News : सावधान! चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ, बाप्पाचं विसर्जन करताना काळजी घ्या 

चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळं गणपती बाप्पाचं विसर्जन करताना नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Pandharpur News : कोरोनाच्या (corona) संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव (Ganesh utsav) साजरा करता आला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या जल्लोषात उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आज राज्यभरात गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहेत. ठिकठिकाणी प्रशासनानं बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली आहे. मात्र, पंढरपूरमध्ये (Pandharpur) गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तयारी केली नाही. त्यामुळं चंद्रभागा नदीत (Chandrabhaga River) गणपती बाप्पाचं विसर्जन करताना नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कारण चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या ही नदी दुथडी भरुन वाहत आहे. 

उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग

पुणे आणि सातारा जिल्ह्यातील परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं धरणांच्या पामी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भीमा नदीत उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आहे.  त्यामुलं चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चंद्रभागेचे पाणी थेट घाटाला लागले आहे. नदी पात्रातील पुंडलीकाचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. सध्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. त्यामुलं नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. 

Pandharpur News : सावधान! चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी वाढ, बाप्पाचं विसर्जन करताना काळजी घ्या 

चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

आज गणेश विसर्जनासाठी नागरिक चांद्रभागेवर येत आहेत. मात्र, आज सकाळी 11 वाजेपर्यंत मुख्य असलेल्या महाद्वार घाटावर देखील प्रशासनाची कोणतीच तयारी नसल्याचे दिसून आले. भाविक या धोकादायक पाण्यात उतरुन बाप्पाचे विसर्जन करत आहेत. याच पद्धतीनं विठ्ठल दर्शनासाठी आलेले भाविक या वाहत्या पाण्यात स्नानासाठी बेधडक उतरत आहेत. त्या भाविकांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन नसल्याने दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे . पाण्याला मोठी ओढ असल्यानं बाप्पाचं विसर्जन करताना एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळं आज बाप्पा विसर्जन करताना नागरिकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे.

आज लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप

आज अनंत चतुर्दशी आहे. आज लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन लाडका बाप्पा भक्तांचा निरोप घेणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हटलं जातं. श्री गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान झाल्यानंतर दहा दिवस लाडक्या गणेशाची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. या दिवशी अनेक जण उपवासही करतात. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Maharashtra Drought Marathi News: देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
देशाला आणि राज्याला दर्जेदार अधिकारी देणारे अधिकाऱ्यांचे गाव तहानलेले; पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, गावकरी हळहळले!
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Embed widget